अकोला न्युज नेटवर्क दिनांक २४ जुलै :- अकोला ते म्हैसांग रस्त्यावर घुसर गावाजवळ पेट्रोल पंपासमोरून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलाच्या मध्यभागाचा मोठा भाग पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अकोला ते अमरावती तसेच अकोला ते म्हैसांग हा रस्ता पूर्णता बंद करण्यात आला आहे. अकोट फाईल येथील आपतात चौकातून हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे म्हैसांग पासूनचा रस्ता बंद करण्यात आला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे घुसर गावाजवळील नाल्यावरून वाहणाऱ्या पुलाचा मधला भाग बुडाला आहे. त्यामुळे मार्ग बंद करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात साततधार पावसाने संपूर्ण जन जीवन विस्कळीत झाली आहे घुसर जवळील असलेल मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने या मार्गांवरील वाहतून तीन दिवसान पासून ठप्प पडली आहे. हा मार्ग बंद असल्याने प्रवाशांनी अकोल्याहून अमरावतीला जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.