ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो रविवार दिनांक 18 जुन 2023 :- अकोला शहरात हत्या होणे ही नित्याची बाब बनली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाच दिवसा पूर्वीच म्हणजे 12 जुन रोजी अकोला रेल्वे स्थानकावर झालेली हत्या ताजी असतानाच आणखी एका हत्येने अकोला शहरात खळबळ उडाली
जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वाशीम बायपास जळवलंच असलेल्या मुख्य रस्त्यावर रात्री 11 ते 11: 30 च्या दरम्यात एक व्यक्ती पडला असून त्याच्या डोक्यवर कोणीतरी जड हत्याराने वार केल्याची माहिती जुने शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सेवानंद वानखडे यांना मिळाली माहिती मिळताच जुने शहर पोलिसांचा ताफा घडणास्थळी दाखल झाला असता येथे उभ्या असलेल्या ट्रकच्या मागील बाजूस अंधारात एक इसम पडला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले पोलिसांनी तपासणी केली असता सदर इसम हा मरण पावला असून त्याच्या डोक्यावर प्रहार केल्याने या इसमचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सूत्रानं कडून प्राप्त माहिती नुसार हत्या झालेल्या इसमचे नाव रंजित देवराव इंगळे वय 48 वर्ष राहणार गंगा नगर बायपस असल्याचे समोर येत आहे तसेच सदर इमन हा दोन्ही पायाने अपंग असून अकोल्यातील SA कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून रिटायर झाल्या नंतर जुने बस स्थानकावर सेतू व सप्ताहिक पेपरचा पत्रकार असल्याचे समोर आले विशेष बाब म्हणजे मृतकाची गाडी घटनास्थळी तशीच उभी असून गाडीला काहीच झाले नाही गाडीवर ठेवलवल्या पिशव्या व पैसे देखील जसेच्या तसेच होते मृतक रंजित इंगळे मारत मारेकऱ्यांनी मारत घासत ओढून अंधारात फेकले असल्याची शक्यता नाकारत येत नाही.
घटनेची माहिती मिळताच अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले व जुने शहर चे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे हे आपल्या कर्मचाऱ्यान सह घटनास्थळी दाखल झाले ठसे तज्ञ आल्या नंतर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह हा शव विच्छेदनासाठी अकोला सरोपचार रुग्णालय येथे पाठवण्यात आला.
दोन्ही पायने अपंग असलेल्या रंजित इंगळे याची हत्या नेमक्या कोणत्या हेतूने व का करण्यात आली या तपासात पोलीस यंत्रणा लागली असून आरोपी नेमका कोण? कोणत्या हेतने या अपंग व्यक्तीची हत्या करण्यात आली या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री तसेच अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस याची आज अकोला क्रिकेट क्लब येथे जाहीर सभा असून आज पर्यत झालेल्या संपूर्ण हत्या या संदर्भात पोलिसान सोबत काही चर्चा होते का या कडे देखील शहर वासियांचे लक्ष लागले आहे.