ANN न्युज नेटवर्क ब्युरो अनुराग अभंग सह आशिष वानखडे दिनांक :- 30 जुन अकोला जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण चांगलेच वाढले असून चालकाचे देखील गाडीवर नियंत्रण राहिले नसल्याने चालकाची अति घाई प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली असून पुणे जाणारी खाजगी लक्झरी बस शेगांव मार्गावर झाली पलटी झाली हा अपघात एवढा भयंकर होता की ट्रायव्हलं ने अक्षरशः दोन पलट्या खाल्या
आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान अकोट येथुन पुणे जाणारी लक्झरी बस एम ए च ३० बी डी १२०१ श्री गणेश ट्रॅव्हल्स कंपनीची बस अकोट वरून पुणे साठी निघाली होती मात्र लक्झरी चालकाचे तेल्हारा तालुक्यातील नेर फाट्याजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरत असताना शेतातील शेताच्या बांधाजवळ खोदलेल्या बराशित पलटी झाली. बस किमान 35 ते 40 प्रवासी असल्याची चर्चा होत होती. ही ट्रायव्हल पलटी झाल्यावर प्रवाशनी जीव वाचवण्यासाठी क्षरशः खिडकीतून उड्या टाकून आपला जीव वाचवला या अपघातात पुण्याला जाणारे २६ प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे त्या सर्वांना पुढील उपचारासाठी अकोला येथे सारवोपचार येथे आणण्यात आले आहे हा अपघात चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने घडला असल्याची प्रार्थमिक माहिती मिळाली असून अपघाताची अधिक माहितीसाठी तेल्हारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रवाश्यांना वाचविण्याचा युद्ध पातळीवर बचावंकार्य सुरु आहे.