अकोला न्यूज नेटवर्क गणेश बुटे प्रतिनिधी आकोट दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ :-अकोट तहसील अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेंर्तगत लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान मागील तीन ते चार महिन्यांपासून मिळाले नाही. त्यामुळे निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे संबंधित अनुदान तत्काळ खात्यांमध्ये जमा करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणे करून त्या पैशाचा उपयोग औषधी खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येईल. निराधारांना अनुदान देण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धआपकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना चालविल्या जातात. या योजनांतर्गत लाभार्थ्याला मासिक अनुदान दिले जाते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही. मानधनाची रक्कम सरळ बॅंक खात्यात जमा होत असल्याने निराधार नागरिक सर्वप्रथम बॅंकेत जाऊन अनुदानाविषयी विचारणा करीत आहेत. मात्र, अनुदानच जमा न झाल्याचे बॅंकेकडून सांगण्यात येत आहे. काही नागरिक तहसील कार्यालयातही विचारणा करीत आहेत. शासनाकडून अनुदान न मिळाल्याने बॅंकेत जमा करण्यात आले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सतत तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे संबंधितांना तत्काळ मानधन दिले जावे, अशी मागणी होत आहे.
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना इलेक्शन कामामुळे उशीर झाला आहे संबंधित कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली आहे यानंतर कोणतेही योजनेची योग्य त्याच वेळी निधी देण्यात यावी जेणेकरून लाभार्थ्यांना वेळेवर निधी प्राप्त होईल,