Tuesday, May 21, 2024
Homeक्राईमअकोला शहरात घडणार होती आणखी एक हत्या! पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ

अकोला शहरात घडणार होती आणखी एक हत्या! पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ

सिव्हिल लाईन पोलिसांनी आजतोवर हत्येतील आरोपी असोत की जबरी घरफोडीतील गुन्हेगार असो आपल्या कामाची तात्परता आणी पोलीस निरक्षकांचे नियोजन याचं मुळे गुन्हे करणाऱ्या आरोपींना पकडण्यात यश येत आहे. एरवी सिनेमात आपण नेहमीच पाहत आलोय की पोलीस घटना घडल्या नंतर पोहोचतात मात्र सिव्हिल लाईन पोलीस मात्र याला अपवाद ठरली असून जर पोलीस वेळेवर पोहचली नसती तर अकोला शहरात आणखी एक हत्या नक्कीच घडली असती

ANN अकोला नेटवर्क ब्युरो दि. 7 जुन :- अकोला शहरात गुन्हेगारी वाढत असली तरी त्यावर अंकुश ठेवण्याचे काम हे पोलिसांचेच असते गुन्हे आणी गुन्हेगार जरी कमी होत नसतील तरी त्यांना रोखण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत असल्याची प्रचिती अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांच्या कारवाई वरून दिसून येत आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे ठाणेदार पदी रुजू होताच आपल्या डिबी पथकला हाताशी धरून कारवाईचा सपाटा सुरु केल.

शहरात गुन्हेगारांमध्ये शस्त्र बाळगणे ही नित्याची बाब झाली आहे पण हेच हत्यार जसे दहशद माजवण्या साठी वापरले जाते त्याच प्रमाणे हेच गुन्हेगार हत्या करण्यासाठी देखील त्याचा उपयोग करतात असेच एक बाहुबली स्टाईलच्या हत्याराने हत्या करण्यास जगाऱ्या गुन्हेगाराला काल रात्रीच्या दरम्यान सिव्हिल लाईन पोलिसांनी पकडले.

सविस्तर हकीकत अशी की सिव्हिल लाईन पोलीस रात्री 9 ते 10 वाजताच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असतात एक युवक आपल्या हातात बाहुबली स्टाईलचे हत्यार घेऊन कोणाला तरी माराण्यासाठी जात असल्याची माहिती डिबी पथकला मिळाली माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना एक युवक हातात बाहुबली सिनेमांत वापण्यात आलेले भले मोठे हत्यार घेऊन जात असल्याचे दिसून येताच पोलिसांनी त्याला अटक केली.

अधिक माहिती घेतली असता सदर आरोपीचे नाव हे ऋषभ विलास रायबोले वय 22 वर्ष राहणार आंबेडकर नगर असल्याचे समोर आले असून आपल्या आईला शिवीगाळ केल्याने आपण त्यास मारण्यास जात असल्याचे आरोपी ऋषभ रायबोले याने पोलिसांना सांगितले. सिव्हिल लाईन पोलिसांची समयसूचकता व तत्परतेमुळे आज आणखी एक हत्याकांड होण्याचे थांबले असल्याची चर्चा परिसरात सुरु होती.

ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक अभय घुगे यांच्या नेतृत्वात सुव्हील लाईन पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊरावं घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐऐसआय कासम नौरंगाबादी उमेश यादव, भूषण मोरे, गणेश निळखन, संजय अकोटकर यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!