अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २१ ऑगस्ट २०२३:-मागच्या काही आठवड्यापासून आशिया चषक संघाच्या चर्चा सुरू होत्या सोमवारी (21 ऑगस्ट) आशिया चषकासाठी भारताचा संघ घोषित केला गेला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली. तब्बल 7 वर्षांनंतर पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघाची घोषणा केली गेली असून दोन प्रमुख खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे श्रेयस अय्यर आणि केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होते पण आता आशिया चषकासाठीच्या संघात या दोघांनाही निवडले गेले आहे तिलक वर्मा याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण आयर्लंडविरुद्ध त्याची बॅट शांत पाहायला मिळाली असे असले तरी, तिलकला या संघात सामील केले गेले आहे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आयर्लंड दौन्यात तब्बल 11 महिन्यानंतर मैदानात पुनरागमन केले बुमराह देखील आशिया चषकाच्या संघाचा भाग आहे. रोहित आणि गिल भारतासाठी सलामीवीराच्या भूमिकेत दिसतील विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकते.
श्रेयस अय्यर किंवा केएल राहुल यांच्यातील एकाला चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी निवडले जाईल यष्टीरक्षक फलंदाजाविषयी मागच्या मोठ्या काळापासून संघ व्यवस्थापनापुढे प्रश्न होता अखेर आशिया चषकासाठी ईशान किशनला 17 सदस्यीय संघात घेतले गेले आहे. संजू सॅमसन आशिया चषकात राखीव खेळाडू म्हणून असेत फिरकीपटूंमध्ये रविचंद्रन अश्विन याचेही नाव आशिया चषकासाठी चर्चेत होते मात्र, अश्विनला या संघात जागा बनवता आली नाहीये त्याचसोबत युझवेंद्र चहल देखील आशिया चषकासाठी संघात स्थान मिळवू शकला नाही. फिरकीपटू गोलंदाज म्हणून भारताकडे रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आणि कुलदीप यादव यांना निवडले गेले आहे हार्दिक पंड्या, रविद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर आशिया चषकात अष्टपैलूची भूमिका पार पाडताना दिसतील. Confirmed Asia Cup 2023 squad of India Rohit (C) Gill, Kohli, Iyer, KL, Surya, Tilak, Kishan, Hardik (VC). Jadeja, Axar, Shardul, Bumrah, Shami, Siraj, Kuldeep and Prasidh Krishna August 21. 2023 आशिया चषक 2023 साठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार) विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव प्रसिद्ध कृष्ण राखीव खेळाडू संजू सॅमसन दरम्यान,
आशिया चषक 2023 पाकिस्तान आणि श्रीलंका याठिकाणी खेळला जाणार आहे. 30 ऑगस्ट रोजी सुरू होणारी ही स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळता जाईल यावर्षी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तान संघाकडे होते मात्र भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यामुळे स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारे आयोजित केली गेली आहे. स्पर्धेत एकून 13 सामने खेळले जाणार असून त्यापैकी 9 सामने श्रीलंकेत, तर 4 सामने पाकिस्तानमध्ये खेळला जातील (India squad announced for Asia Cup 2023) बातमी अपडेट होत आहे महत्वाच्या बातम्या शिखर धवनची भविष्यवाणी विश्वचषकात हे पाच खेळाडू करणार धमाका यादीत दोन भारतीय बुमराहच्या नावावर मोठा विक्रम खास यादीत तिसरा क्रमांक मिळवण्यासाठी हार्दिक पंड्याला टाकले मागे