Saturday, November 9, 2024
HomeUncategorizedकारसह १४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कारसह १४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २० जुलै :- कारमधून प्रतिबंधित गुटखा नेत असताना, स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी दुपारी नया अंदुरा येथे छापा घालून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून कारसह १४ लाखांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला.

अकोला जिल्ह्यात गुटख्याची अवैध रित्या सऱ्हास वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर येत आहे….काल देखील स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांना १९ जुलै रोजी एमएच ४३ एएल २०६४ क्रमांकाच्या इनोव्हा कारमध्ये नया अंदुरा येथील हरिओम उर्फ ओम उमेश कराळे (२१), अमोल रवी तायडे, हे प्रतिबंधित सुंगधित तंबाखू व गुटखा विक्रीकरिता घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पीएसआय देशमुख यांनी त्यांच्या पथकातील अंमलदार व पंचासह ग्राम नया अंदुरा येथे नाकाबंदी कार थांबवली. कारमधील विविध प्रकारचा शासनाने प्रतिबंधित केलेला व आरोग्यास अपायकारक गुटखा जप्त केला. पोलिसांनी कारसह गुटखा असा एकूण १४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन उरळ येथे विविध कलमानुसार नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभयकुमार डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांच्या मार्गदर्शनात दत्ता ढोरे, विशाल मोरे यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp