Monday, September 16, 2024
Homeताज्या घडामोडीप्लास्टिकच्या बाटली मधील पाणी पिताय तर सावधान. नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा

प्लास्टिकच्या बाटली मधील पाणी पिताय तर सावधान. नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १० जानेवारी २०२४:- आजकाल व्यवहारात सर्वत्र प्लास्टिकचा मुक्तपणे वापर सुरु आहे. तुम्ही विविध बँडचे बाटली बंद पाणी निर्धोक समजून पित असाल तर सावधान रहा. प्लास्टिक बाटलीतून पाणी पिण्याची सवय असेल तर तुम्हाला धक्का बसेल अशी एक बातमी आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि रटगर्स युनिव्हर्सिटी यांच्या संशोधकांनी एक अभ्यास केला आहे. या अभ्यातून जे निष्कर्ष बाहेर आले आहेत ते धक्कादायक आहेत. या अभ्यासानूसार एका लिटर बाटली बंद पाण्याच्या आत सरासरी 2,40,000 छोटे- छोटे प्लास्टिकचे तुकडे असतात. आधीच्या अंदाजानूसार हा आकडा 10 ते 100 टक्के जास्त असून त्यामुळे चिंता वाढली आहे. आधीचा अभ्यास मोठ्या आकाराच्या मायक्रोप्लास्टिकवर आधारित होता. परंतू या नव्या अभ्यासात नॅनो प्लास्टिकवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. नॅनो प्लास्टिकचे कण त्याहून कमी आकाराचे असतात. जवळपास आपल्या एका केसाच्या व्यासाएवढा त्यांचा आकार असतो. हे कण मायक्रोप्लास्टिक कण तुटल्यानंतर तयार होतात. संशोधकांच्या मते आधीच्या अभ्यासापेक्षा दोन ते तीन पट अधिक नॅनो प्लास्टिक कणांचा शोध लागणार आहे.

नॅनो प्लास्टिक का खतरनाक..
नॅनो प्लास्टिक कणाच्या इतक्या छोट्या आकारामुळे ते धोकादायक बनले आहेत. त्यामुळे ते मानवाच्या शरीरात सहज प्रवेश करू शकतात. आणि रक्त प्रवाहात प्रवेश करू शकतात. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ज्याज सूज येणे, ऑक्सीडेटिव्ह तणाव, पेशी डॅमेज होणे आणि अवयवाचे नुकसान यांचा समावेश आहे. त्याशिवाय नॅनो प्लास्टिकचे कण हानिकारक केमिकल देखील वाहून घेऊ जाऊ शकतात. त्यामुळे आरोग्याला अधिक धोका आहे.

नॅनो प्लास्टिकची पातळी खूप जास्त…
संशोधकांनी अमेरिकेत विकले जाणाऱ्या बाटली बंद पाण्याच्या तीन लोकप्रिय ब्रँडची चाचणी केली. (ब्रँडची नावे उघड केलेली नाहीत ) या बाटली बंद पाण्यातील 100 नॅनोमीटर आकाराच्या प्लास्टिक कणांचा अभ्यास केला गेला. अभ्यासात आढळले या बाटली बंद पाण्यात नॅनो प्लास्टिकचे कणांची पातळी अधिक आढळली. हा अभ्यास बाटली बंद पाण्याच्या आतापर्यंतच्या आपल्या समजाला तडा देतो. त्यामुळे प्लास्टिक पाणी बाटली बंद असो वा कसेही तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे टाळले पाहीजे. कारण बाटली बंद पाण्यातही नॅनो प्लास्टिक कणांचे प्रमाण आढळले आहे.

काय करायला हवे…
घरातून बाहेर पडताना तूम्ही बाटली बंद पाणी विकत घेऊन पिण्यापेक्षा घरातील पाणी काचेच्या किंवा धातूच्या बाटलीतून घेऊन बाहेर पडायला हवे. प्लास्टिकच्या बाटलीचा वापर वारंवार करू नये. रिसायकल करण्यायोग्य बाटलीचा किंवा स्टीलच्या बाटलीचा वापर करावा. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपल्याकडून पर्यावरणाची देखभाल देखील होईल. तसेच आपल्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाईल. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की आपण प्लास्टिकच्या धोक्याला हलक्यात घेऊ नये. आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमीत कमी करायला हवा. आणि आरोग्यादायी पर्यायांचा वापर वाढवायला हवा. तरच आपण सुरक्षित आणि स्वास्थ्यपूर्वक भविष्याची आशा बाळगू शकतो.(ANN NEWS NETWORK)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp