अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ जुलै २०२३ :- गेल्या २२ वर्षापासूनच्या हिवरखेड वासियांच्या संघर्षाला अखेर यश आले असून हिवरखेड नगरपरिषदेची प्राथमिक उद्घोषणा आज दिनांक २६ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात करण्यात आली असून याचा हिवरखेड वासियांनि ठीक ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. हिवरखेड या गावाची लोकसंख्या चाळीस 40 हजाराच्या वर असून क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तालुक्याचे ठिकाण असलेले तेल्हाऱ्या पेक्षा मोठे गाव म्हणून हिवरखेड चा नावलौकिक आहे मात्र विकास कामांच्या दृष्टिकोनातून हे गाव काही प्रमाणात मागास होते हिवरखेड येथे नगरपंचायत किंवा नगरपरिषद व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, पक्ष, व पत्रकार संघटनांकडून वारंवार विविध आंदोलने, निदर्शने करण्यात आली त्याची फलश्रुती म्हणून काही दिवसापूर्वी हिवरखेड नगरपंचायत तिची प्राथमिक उद्घोषणा शासनाकडून करण्यात आली होती
मात्र त्यावर काही कारणास्तोवर स्थगनादेश आला त्यामुळे हा सगळा दोष काही नागरिकांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यावर दिला व त्या अनुषंगाने गावातील व्यापारी, लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी एक महत्त्वपूर्ण सभा घेऊन आमदार प्रकाश भारसाकळे यांना भेटण्याचे नियोजित केले त्या अनुषंगाने आमदार भारसाकळे यांची भेट घेऊन सदर शिष्टमंडळाने हिवरखेड नगरपंचायतीवरील स्थगनादेश उठवण्याची विनंती आमदार भरसाकळे यांना केली. मात्र आमदार भारसाकळे यांनी हिवरखेड नगरपंचायत ऐवजी हिवरखेड नगरपरिषद करून देतो असे आश्वासन उपस्तीत नागरिकांना दिले हिवरखेड नगरपरिषद होण्यात काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आमदार भारसाकळे हिवरखेड नगरपरिषद करतील की नाही यावर गावात तर्क वितरकांना पेव फुटला होता मात्र आज २६ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या प्रयत्नांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवरखेड नगर परिषदेची प्राथमिक उद्घोषणा केली.
हिवरखेड नगरपरिषदेची घोषणा झाल्यामुळे हिवरखेड वासियांनी शहरात ठीक ठिकाणी रॅली काढून मिठाई व पेढे वाटून ढोल ताश्यांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. हिवरखेड ग्रामपंचायतचे उपसरपंच रमेश भाऊ दोतोंडे यांच्या सहकार्य केल्याबद्दल हजरत टिपू सुलतान एक युद्ध युवा मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला. तात्काळ हिवरखेड नगरपरिषदे बाबत उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून हिवरखेड नगरपरिषद प्रत्यक्षात अस्तित्वात आणावी ही अपेक्षा मांचचे पदाधिकाऱ्यांना आणि नागरीकांनी व्यक्त केली आहे.