Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीशिक्षण विभागाचा मोठा निर्णय! जूनपासून मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! जूनपासून मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १२ फेब्रुवारी २०२४:- राज्य सरकार मुलींच्या सक्षमीकरणावर नेहमीच जोर देत असल्याचं पाहायला मिळत. त्यामुळे मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात नेहमीच काही ना काही बदल करत असतात. अशातच आता शिक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. म्हणजे राज्यातील मुलींसाठी एकप्रकारे खुशखबर आहे. (Free Education For Girl)

Free Education For Girl l मुलींना 600 पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत मिळणार :
आता यापुढे राज्यातील इंजिनिअरिंग, मेडिकल यांसह 600 पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे शिक्षण राज्यातील मुलींना मोफत मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. मात्र राज्य सरकारे यासाठी काही अटी घातल्या आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाची अट म्हणजे ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख व त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना या मोफत शिक्षणाचा (Education) लाभ मिळणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Free Education For Girl l उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या मोफत शिक्षणाची अंलबजावणी यंदाच्या वर्षी म्हणजेच जून महिन्यापासून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी केलेल्या घोषणेची सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.

या योजनेमुळे मुलींचे उच्च शिक्षणाची दारे उघडतील :
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध नवीन इमारतींच्या उद्घाटनाचा सोहळा (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University) पार पडला आहे. या उदघाटन सोहळा कार्यक्रमात बोलताना राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इंजिनिअरिंग, मेडिकल (Education) यांसह 600 पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे शिक्षण राज्यातील मुलींना मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच बोलताना म्हटले की, मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या तब्बल 600 हून अधिक अभ्यासक्रमांना (Education) मोफत शिक्षण दिले जाणार आहे.

कारण मेडिकल व इंजिनिअरिंग यांसारख्या अभ्यासक्रमांना पालकांचे लाखो रुपये खर्च होतात. यामुळे सामान्य कुटूंबातील मुले उच्च व तंत्र शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे जर राज्यातील मुलींना उच्च शिक्षण देऊन या योजनेमुळे मुलींचे उच्च शिक्षणाची दारे उघडली जातील. (Free Education For Girl)

Free Education For Girl l तसेच 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या इतर मागास वर्ग व आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची पूर्णपणे म्हणजेच 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात जास्तीतजास्त मुलींचे प्रवेश होण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.

Free Education For Girl l सरकारच्या या निर्णयामुळे मुलांमध्ये नाराजी पसरली :
मात्र उच्च शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मुलांमध्ये नाराजी पसरलेली दिसून येत आहे. कारण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध नवीन इमारतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोहळा संपताच मंत्री चंद्रकांत पाटील व्यासपीठावरून बाहेर पडताच कित्येक तरुणांनी त्यांना अडवत केवळ मुलींना सवलत देण्यात का आली असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच याशिवाय

कमी उत्पन्न गटातील मुलांनाही मोफत शिक्षणाची (Free Education For Girl) तरतूद करण्याची मागणी यावेळी तरुणांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी तरुणांना आश्वसन दिले आहे. मी तुमची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवतो असे आश्वासन चंद्रकात पाटील यांनी दिले आहे. मात्र आता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांच्या या आश्वासनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे सर्व राज्यातील तरुण मुलांचे लक्ष लागले आहे. तसेच सरकारने देखील हा निर्णय लवकरत लवकर घ्यावा असे तरुणांकडून बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!