Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीनितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या बस आणि कारचे स्वप्न दाखवणाऱया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला पुन्हा एकदा एक मोठे स्वप्न दाखवले आहे. वायुप्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार लवकरच नवीन धोरण आणणार आहे. एक दिवस असा येईल ज्या वेळी देशात कोणताही पेट्रोल आणि डिझेल पंप नसेल, असा आशावाद गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.डेटॉल बनेगा स्वस्थ इंडिया सीजन 10 या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले,

आम्ही प्रदूषणाला कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहोत. एक दिवस असा येईल ज्या वेळी कोणताही पेट्रोल-डिझेल पंप नसेल. याऐवजी आपल्याकडे इलेक्ट्रिक वाहनांसाठी इथेनॉल पंप आणि चार्ंजग स्टेशन असतील. एलएनजी आणि सीएनजी प्रणालीने तयार केले जातील. प्रदूषणांमुळे किती वाईट परिणाम होतात हे सांगताना गडकरी म्हणाले की, दिल्लीसारख्या शहरात प्रदूषणासंबंधी सर्व्हे करण्यात आला.

या सर्व्हेतून धक्कादायक खुलासे करण्यात आले. आपले आयुष्य वायुप्रदूषणामुळे दहा वर्षे कमी होत आहे. महात्मा गांधी यांनी जी ‘स्वस्थ हिंदुस्थान मोहीम’ सुरू केली होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही मोहीम गंभीरपणे पुढे चालवली आहे. या मोहिमेसाठी देशभरात एक पॉलिसी बनवली जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp