अकोला न्यूज नेटवर्क शाहबाज देशमुख प्रतिनिधी बाळापूर दिनांक १० नोव्हेंबर २०२३ :- लोहारा {शाहबाज देशमुख } बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे स्वछ भारत अभियान अंतर्गत गुडमॉर्निंग पथकाने पहाटे पांच वाजता गावात भेट दिली असता हालिमा हॉपिटल च्या बाजूला व शाळेच्या मागे उघड्यावर शौच करणाऱ्या 19 महिला पुरुषाला बेशरम तसेच गुलाबा चे फुल देऊन त्यांचा सत्कार व त्यांना समजूत देऊन सोडण्यात आले त्यात दोन आजी माजी ग्रामपंयात सदस्य चा समावेश होता आपला देश हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना अपघातही गावाच्या आजूबाजूलाच अनेकझण उघड्यावर बसतात त्या मुळे हागंदारीमुक्ती हे घोषणा हवेत विरत असताना दिसत आहे कोरना पासून गुडमॉर्निंग पथक गायब झाले होते आज अचानक पहाटे पथक गावात येताच उघड्यावर शौच ला जाणारे व बसणारे पळापळ सुरु झाली तसेच नदीतून रेती भरणारे वाहनांची पळापळ पाहावयाला मिळाली या पथका मध्ये बाळापूरचे विस्तार अधिकारी बी पि पजई राहुल गोडले प्रवीण पाचपोर प्रल्हाद पाखरे ग्रामविकास अधिकारी जि एम बाळापुरे सरपंच प्रवीण मोरे ग्रामपंचायत सदस्य शाहबाज देशमुख शकील ठेकेदार जुनेद कुरेशी महेंद्र मोरे अंगणवाडी सेविका मदतनीस अशा वर्कर उपस्तित होते
कोट शौचालय चा अनुदान घेऊन ही शौच साठी उघड्यावर जाने चुकीचे आहे हे पथक पुन्हा गावाला भेट देऊन उघड्यावर शौच साठी बसणाऱ्यावर नियम नुसार कारवाई करेल जर कोणी गुडमॉर्निग पथकाच्या कर्मचारी सोबत कोणी वाद घालत असेल तर त्याची पोलीस ठाण्याला तक्रार देण्यात येईल बि पी पजई विस्तार अधिकारी बाळापूर