अकोला न्यूज नेटवर्क शाहबाज देशमुख प्रतिनिधी लोहारा दिनांक ०३ फेब्रुवारी २०२४:- लोहारा येथून काही अंतरावर असलेले डोंगरगाव येथे स्व नानाराव देविदास नेमाडे यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ दम्मणी नेत्र रुग्णालय अकोला यांचे मार्फत रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हॅगिंग गार्डन, मुंबई यांच्या सौजन्याने नेत्र तपासणी व मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर शनिवार रोजी संपन्न झाले शिबिरामध्ये एकुण 160 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली यापैकी 40नेत्र रुग्णांची निवड मोतीबिंदू शस्त्रक्रिया लेन्स टाकून अत्याधुनिक विनाटाका पध्दतीने दम्माणी नेत्र रुग्णालय अकोला येथे मोफत दरात करण्यासाठी निवड झाली आहे शिबिरामध्ये दम्माणी नेत्र रुग्णालयाची वैद्यकीय चमु डॉ दत्ता पवार सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ,व त्यांच्या सहयोगी अजय देशमुख यांनी रुग्णांची तपासणी केली
तसेच शिबिरादरम्यान गरजु रुग्णांना जवळच्या नंबरचे चष्मे देण्यात आले. श्री सत्यसाई सेवा संघटना गोरक्षण रोड अकोला तर्फे सुनील सरोदे यांनी नेत्र विकार संबंधी औषधीचे वाटप नेत्र रुग्णांना मोफत केले डोंगरगांव येथे या नेत्र वैद्यकीय सेवा शिबिराचे सतत सहाव्यांदा आयोजन आयोजक प्रा.डॉ.शिरीष नानाराव नेमाडे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत कार्यालय डोंगरगांव येथे शिबिराचे आयोजन करण्याकरिता सरपंच सौ सुचिता ताई रविंद्र नेमाडे व सर्व कार्यकारिणी ग्रामपंचायत डोंगरगांव यांचे सहकार्य लाभले या भव्य नेत्र शिबिराचे यशस्वी आयोजन करण्याकरिता डोंगरगांव येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते यांचे अथक परिश्रम घेऊन विशेष सहकार्य केले.