Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीजीर्ण वर्गखोल्या पाडल्या मात्र नवीन बांधकामास प्रारंभ होईना.दिग्रस बु. जिल्हा परिषद शाळेत...

जीर्ण वर्गखोल्या पाडल्या मात्र नवीन बांधकामास प्रारंभ होईना.दिग्रस बु. जिल्हा परिषद शाळेत वर्गखोल्या नसल्याने पालकांचा रोष,शाळेतून विद्यार्थी काढण्याचा निर्णय.

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४:- पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद केंद्रीय शाळेला आदर्श शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या शाळेच्या जुन्या जीर्ण वर्गखोल्या मागील अनेक वर्षांपासून पाडल्या असून, आतापर्यंत नवीन वर्गखोल्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागेची अडचण येत असून, शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत विचारणा केली असता, प्रशासनांकडून प्रस्ताव पाठविला एवढेच सांगण्यात येत आहे.

जिल्हा परिषद शाळेत १ ते ८ वीपर्यंत शिक्षण असून, पातूर तालुक्यातील सर्वप्रथम सेमी इंग्रजी (कॉन्व्हेंट) सुरू करण्यात आले होते. वर्गखोल्या नसल्याने कॉन्व्हेंट बंद केले आहे. इतर वर्गातून पालक वर्ग पाल्याला शाळेतून काढण्याचा निर्णय घेत आहेत.या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित विभागाकडून शिक्षणाधिकारी, प्रशासन विभाग दुर्लक्ष करीत आहेत.

परिसरातील वृक्षाखाली वर्ग बसवितात एकत्र

  • आतापर्यंत वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने काही वर्ग एकत्रित बसवावे लागत आहेत, तर काही वर्गखोल्यांसमोर असलेल्या खुल्या जागेत झाडाखाली बसावे लागते. परिणामी, विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष लागत नसून, अनेक विद्यार्थी व पालक वर्गातून रोष व्यक्त होत आहे,अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी या गंभीर प्रकारकडे लक्ष देऊन प्रस्तावित वर्गखोल्या बांधाव्यात,अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.

समस्या सोडविण्याची मागणी.
शिक्षण विभागाने तत्काळ वर्ग खोल्यांची समस्या सोडवावी, जेणेकरून विद्यार्थी गलती होणार नाही. या शाळेचा दर्जा घसरणार नाही, अशी पालकांकडून मागणी होत आहे.

या गावातील विद्यार्थी शिकतात!
जिल्हा परिषद शाळेत तुलगा, दिग्रस खुर्द, दिग्रस बु., तांदळी आदी गावातील विद्यार्थी शिकायला येतात. या शाळेत विज्ञान खोली, संगणक खोली आदी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्व सोयी उपलब्ध आहेत, परंतु वर्ग खोल्या नसल्याने अडचण वाढली आहे. या वर्गखोल्या बांधण्यास सुरुवात झाली नाही, तर याचा परिणाम विद्यार्थी गळतीत होऊ शकतो, वर्गखोल्या नसल्याने विद्याथ्यर्थ्यांनी कुठे बसावे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने शाळेतील शिक्षकांचीही डोकेदुखी वाढली आहे.दिग्रस बु येथील आदर्श शाळा असून, चार महिन्यापासून मंजुरात आहे.परंतु प्रशासनच्या चुकीमुळे वर्ग खोल्याच्या बांधकाम थांबले आहे.याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार करून दुर्लक्ष केल्या जात आहे..

मायाताई नाईक शिक्षण सभापती अकोला
शाळेच्या वर्गखोल्या बांधकाम सुरू करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात सुरू आहे तरी सुद्धा काम सुरू केल्या जात नाही.प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी तत्काळ दखल घेऊन काम सुरू करण्यात यावे..

संजय बरडे मुख्याध्यापक आंतरराष्ट्रीय जी प शाळा
शाळेला वर्ग खोल्या बांधल्या नाही त्यामुळे माझ्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे माझ्या मुलीला शाळेतून काढनार आहे.
मनोज गवई पालक दिग्रस बु
माझ्या मुलीला दिग्रस खुर्द वरून आंतरराष्ट्रीय शाळा व शिक्षण चांगले आहे म्हणून माझ्या गावतुन आटो ने शिक्षणासाठी पाठविला जाते.परंतु शाळेत वर्गखोल्या नसल्याने मोठी अडचण निर्माण झालं.वर्गखोल्या न बांधल्यास मी माझ्या मुलींना शाळेतून बाहेर काढणार आहे.
सुभाष इंगळे पालक दिग्रस खुर्द

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!