Wednesday, October 9, 2024
Homeब्रेकिंगब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडला

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडला

अकोला न्यूज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ :-ब्रिटनमध्ये कोविडचा एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. मात्र, या व्हेरियंटमुळे घाबरण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्रिटनच्या आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मे महिन्यापासून नवीन व्हेरिएंटची (ANN NEWS) सात प्रकरणे आढळली होती. इग्लंडमधील आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार ओमिक्रॉनमधून आला आहे. त्याला EG.5.1 Aris असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दोन आठवड्यांपूर्वी EG.5.1 व्हेरियंटचा मागोवा घेण्याती सुरूवात केली. देशातील सर्व कोविड प्रकरणांपैकी ते आता 14.6 टक्के आहे. ‘रेस्पिरेटरी डेटामार्ट सिस्टम’ द्वारे नोंदवलेल्या 4,396 नमुन्यांपैकी 5.4% कोविड-19 म्हणून नोंदवले गेले. या आठवड्यातील अहवाल कोरोना प्रकरणांमध्ये वाढ दिसत आहे. यामध्ये वृद्ध रुग्ण मोठ्या संख्येने रुग्णालयात येत आहेत. नियमितपणे हात धुवावेत, यामुळेच विषाणूंपासून संरक्षण होते. श्वसनाच्या आजाराची लक्षणे आढळल्यास डाॅक्टरकडे जावे, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp