Friday, May 10, 2024
Homeकृषीदेशाच्या या भागांत मान्सूनचे पुनरागमन मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

देशाच्या या भागांत मान्सूनचे पुनरागमन मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २ सप्टेंबर २०२३:-अनेक दिवसांच्या विश्रातीनंतर महाराष्ट्रासह देशभरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. या वर्षी, देशात 1901 नंतर ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. आता पुन्हा एकदा दक्षिण पश्चिम मान्सून सक्रिय होण्याचे संकेत हवामान विगागाने दिले आहेत. त्यामुळे देशाच्या मध्य आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, 2 सप्टेंबर (शनिवार) रोजी देशाच्या काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडेल.केरळमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. या भागात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या ठिकाणी पाऊस पडेल
तसेच देशाच्या विविध भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण झारखंडमध्ये रात्री मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. या भागात वीज पडण्याचीही शक्यता आहे. हवामान विबाच्य म्हणण्यानुसार, सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस झाला तरी, जून ते सप्टेंबर या सत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस न पडण्यामागे पॅसिफिक महासागरातील एल निनो वादळाचे कारण होते.

या राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे
2 सप्टेंबर (शनिवार) रोजी ओडिशा, पूर्व आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही पावसाने हजेरी लावली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे लखनौ तसेच पूर्व उत्तर प्रदेशात ५ आणि ६ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात आता सकारात्मक फरक सुरू झाला आहे, ज्यामुळे अल निनो वादळाचा प्रभाव उलटू शकतो. पूर्वेकडे सरकणाऱ्या ढगांची हालचाल त्या भागात पुन्हा मान्सूनच्या आगमनात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

(AKOLA NEWS NETWORK)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!