महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त कर्ज योजनेतर्गंत जिल्ह्यातील 18 लाभार्थ्यांना 45 लाख रक्कमेचे कर्जाचे वितरण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राज्य व केंद्र पुरस्कृत कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वितरण करण्यात आले. यावेळी समाज कल्याण कार्यालयाचे उपायुक्त अमोल यावलीकर, जिल्हा अग्रणी बँकचे नयन सिन्हा, कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग, तसेच विविध महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.