अकोला न्यूज नेटवर्क दिलीप जाधव प्रतिनिधी बार्शीटाकळी दिनांक ०६ऑगस्ट २०२३ :-बार्शिटाकळी येथे आज ६ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये व जिल्हा अध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनात व तालुका कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड तसेच बार्शीटाकळी वंचित चे ज्येष्ठ नेते नईमोद्दिन शेख यांच्या प्रमुख नेतृत्वात हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीम वाटीकेतून मोर्चाला सुरुवात झाली ते तहसील कार्यालय बार्शिटाकळी इथपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये माननीय तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी दीपक बाजड तहसील कार्यालय बार्शिटाकळी यांना एक निवेदन लेखी स्वरूपात देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे बार्शीटाकळी तालुका पदाधिकारी व शहर कार्यकर्ते यांच्या मार्फत आज लोकहित कारक मागण्यासाठी शासन दरबारी काही मागण्या मांडण्यात आल्या. सदर मागण्या दीड महिन्यापासून पावसाने दांडी मारली असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या पीक सुकले असून पीक पूर्ण उध्वस्त झाले आहे
त्यामुळे शेतकरी बांधवांच्या तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे. तसेच शासनाने रमई आवास, योजना शबरी आवास योजना तसेच पंतप्रधान योजनेची प्रत्येक ग्रामपंचायत नगरपंचायतला घरी मंजूर करणेबाबत टारगेट दिले आहे परंतु बहुसंख्य गरीब लोकांकडे मालकी हक्क घराचे नमुना आठ नाही आहेत. त्या अनुषंगाने आमच्या मार्फत खालील मागणी आपणास निवेदन सादर करीत आहोत प्रमुख मागण्या. बार्शीटाकळी तालुका दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी.
दुष्काळची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिक्रमणधारक घरकुलवासी यांना घरकुलाचा लाभ ताबडतोब द्या या चार प्रमुख मागण्या असून त्या मागण्या ताबडतोब आपल्या स्तरावरून शासन दरबारी पाठवून त्या मान्य कराव्या आणि काढलेल्या जन आक्रोश मोर्चाला सहकार्य करावे. जर या निवेदनाची दखल न घेतली गेल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल करिता आपणास माहितीस्तव अशा प्रकारचे लेखी निवेदन देण्यात आले असून वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
तालुका कार्याध्यक्ष, गोरसिंग राठोड, महासचिव अजय अरखराव, तालुका कोषाध्यक्ष सय्यद रियासत, तालुका संघटक हरीश रामचौरे, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, मीडिया प्रमुख निलेश इंगळे, तालुका उपाध्यक्ष विलास वाहूर वाघ, अमोल जामनिक युवा तालुकाध्यक्ष, निलेश इंगळे मीडिया प्रमुख, श्रीकृष्ण सोळंके उपाध्यक्ष वसंता भाऊ चव्हाण उपाध्यक्ष,शुद्धोधन इंगळे, राजेश तुळशीराम खाडे,अरुण चव्हाण , सहदेव चव्हाण ,महिला आघाडी तालुकाध्यक्ष वैशालीताई कांबळे , महासचिव उज्वलाताई गडलिंग, अनुराधा ताई ठाकरे,श्रुष्टी अनघा ठाकरे,शुभम मोहन इंगळे तमीज खान उर्फ गोबासेठ , सुरेश जामनिक माजी न पं उपाध्यक्ष, माजी नगरसेवक श्रावण भातखडे , सुनील विठ्ठलराव शिरसाट गटनेता , प्रवीण शांताराम वानखडे , इब्राहिम खान, जगदीश महादेव सरकटे , राजकुमार खडे , राजेश गोपाळ खंडारे , किरण गोकुळ पवार, अमित तायडे, दिनेश भाऊ मानकर, संघपाल इंगळे , अर्जुन बुधनेर , उमेश नागे, किरण पवार , अनिल चव्हाण,अमित आखाडे , जनार्दन गवळी , श्रीकृष्ण भगत , रामदास खिराडे, जीवन सावध, सहदेव चव्हाण , सुभाष कुटे , दादाराव भाऊ सुरडकर माजी प्रभारी, प्रकाश सरकटे, मनोहर खंडारे, सुभाष गवळी, कैलास सरकटे, दिगंबर, प्रवीण इंगळे, संतोष गवई, ज्योतीराम राठोड , मधुकर राठोड , देविदास खंडारे , गुलाबराव पृथ्वीराज भाऊ खंडारे , धर्मवीर गवई, सुरेंद्र सिंग सोळंके , हर्षवर्धन मोहोळ , आदित्य खंडारे , मकरंद राठोड , प्रा . सुनील जाधव, शोएब खान , गोपाळ चव्हाण, रमाबाई वाकोडे , प्रभा सरकटे , सुमन दाभाडे , सरगम सावळे , वसंताबाई सुरवाडे , रेखा आंधळे , वाकोडे , चंद्रमाला क्षीरसागर , संगीता वानखडे , शोभा धुरंदर, देवांगना शिरसाट, सिंधू दाभाडे , अर्चना सावळे , मंगला धुरंदर , अनिता चक्रनारायण, पार्वता धुरंदर, शोभा नवघरे, पार्वता शिरसाठ, वंदना शिरसाठ, रमा धुरंदर, निशा शिरसाठ, उषा अंभोरे, रीना सरदार, व बार्शिटाकळी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते(AKOLA NEWS NETWORK)