मुलाला स्मार्टफोन देण्यासाठी योग्य वय कोणते आहे? हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात नक्कीच आला असेल. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की जेव्हा मूलं हट्ट करतात किंवा रडतात तेव्हा त्याला शांत करण्यासाठी त्यांचे पालक सर्रास फोन त्याच्या हातात देतात. मुल कधीकधी फोनवर व्हिडिओ स्क्रोल करताना किंवा गेम खेळताना दिसतात. आधी पालकांचा फोन मागवण्याचा हट्ट करणारी मुलं हळूहळू स्वत:चा वेगळा मागवण्याचा हट्ट करू लागतात. अनेक वेळा हट्टीपणात मुलं खाणं-पिणंही सोडून देतात.
मुलांना फोन देण्याचे योग्य वय कोणते? अमेरिकेतील नॉन-प्रॉफिट मीडिया ऑर्गनायझेशन नॅशनल पब्लिक रेडिओ अर्थात NPR ने मुलांना स्मार्टफोन देण्यासाठी योग्य वयावर एक लेख प्रकाशित केला आहे. स्क्रीन टाईम कन्सल्टंट एमिली चेर्किन यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. एमिली म्हणते की, मुलांना स्मार्टफोन किंवा सोशल मीडियाचा वापर करण्यास तुम्ही जितका उशीर करू शकता तितके चांगले. ती म्हणते, “मी अनेक पालकांना भेटते, तेव्हा प्रत्येक जण हेच म्हणतात की आम्ही आम्ही मुलांना स्मार्टफोन देण्यासाठी घाई केली. याच्या परिणामांबद्दल माहिती असते तर आम्ही निश्चीतच या बाबतीत योग्य निर्णय घेवू शकलो असतो.
![](https://gtplnewsakola.in/wp-content/uploads/2023/07/photo_2023-07-13_18-25-52-1-724x1024.jpg)
मुलांना स्मार्टफोन देण्याचे धोके काय आहेत? आणखी एका संस्थेच्या कॉमन सेन्स मीडियाच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 11 ते 15 वयोगटातील 1300 मुलींपैकी 60 टक्के मुलींना स्नॅपचॅटवर अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला होता आणि आक्षेपार्हय संदेश पाठवले होते. टिक टॉक वापरणाऱ्या 45 टक्के मुलींच्या बाबतीत असे घडले आहे. सोशल मीडिया हा लहान मुलांसाठी अनुकूल नसलेल्या सामग्रीने भरलेला आहे. यामध्ये लैंगिक सामग्री, हिंसेशी संबंधित सामग्री, स्वत: ची हानी संबंधित सामग्री समाविष्ट आहे. यासोबतच प्रत्येक प्लॅटफॉर्मवरील इनबॉक्समध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा भरणा आहे जे मुलांशी घृणास्पद बोलतात. या सर्वांचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
स्मार्टफोनला पर्याय काय? गरज असेल तेव्हा तुमचा फोन मुलांना द्या, जेणेकरून ते त्यांच्या मित्रांशी बोलू शकतील किंवा त्यांना संदेश देऊ शकतील.
त्यांना स्मार्टफोन देण्याऐवजी असा फोन द्या म्हणजे फक्त कॉल आणि एसएमएस करता येतील. स्मार्टफोनसारखे दिसणारे डंब फोनही बाजारात आहेत, पण त्यांच्याकडे फक्त बेसिक फोनची सेवा आहे.
स्मार्टफोन, सोशल मीडिया किंवा व्हिडिओ गेम्स मुलांना चुंबकाप्रमाणे आपल्याकडे खेचतात. एकदा का ते मुलांच्या हातात गेले की त्यांना त्यातून दूर करणे अशक्य होऊ शकते. मुलांचा मेंदू पुरेसा विकसित झालेला नसतो की ते त्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकतील. म्हणूनच मुलांना स्मार्टफोन देण्यात जितका उशीर करता येईल तितका करा आणि जर ते द्यायचेच असतील तर पालकांच्या नियंत्रणाने द्या.
![](https://gtplnewsakola.in/wp-content/uploads/2023/07/photo_2023-07-14_12-10-55-576x1024.jpg)