Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीहर बोला महादेव च्या गजरात होणार धारगड यात्रा ३ सप्टेंबरला यात्रेला होणार...

हर बोला महादेव च्या गजरात होणार धारगड यात्रा ३ सप्टेंबरला यात्रेला होणार सुरुवात

अकोला न्यूज नेटवर्क सागर भलतिलक प्रतिनिधी बोर्डी.(अकोट) दिनांक ०२ सप्टेंबर २०२३ :-मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात असलेल्या धारगड येथील महादेव यात्रेला श्रावण महिन्याच्या तिसर्या सोमवारला सुरवात होणार असून शिवभक्त ‘हर हर बोला महादेव’चा गजर करत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात याहीवर्षी हजारोंच्या संख्येने दाखल होणार आहेत. निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्माचा सुरेख संगम असलेल्या या महोत्सवाला ३सप्टेंबर पासून सुरवात होणार असून यात्रेत सहभागी होणाऱ्या भक्तांना ४ तारखेला सायंकाळी ६ वाजजेपर्यत मंदिर परीसर खटकाली नाका येथुन भावीकांना बाहेर पडने बंधनकारक राहणार आहे असे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशीध्दी पत्रकात म्हटले आहे

सातपुडाच्या पर्वतरांगांमध्ये ३००० फूट उंचीवर नरनाळा किल्ल्याच्या छातीशी वसलेले धारगड येथील शिवमंदिरात चारकोनी गुहा असून त्यात दोन स्वयंभू शिवलिंग व नंदी आहे. धारगड अकोटवरून पाऊल वाटेने सुमारे २५ कि.मी. तर प्रमुख मार्गाने ३७ कि.मी. दूर येते. बहुतांश शिवभक्त पाऊल वाटेनेच जात जलाभिषेक करणार आहेत. दरम्यान धारगड मोहोत्सवाकरिता प्रशासनही

भक्तांवर नैसर्गिक जलाभिषेक
अकोट येथून बोडी, शिवपूर, कासोद, अमोनामार्गे श्री क्षेत्र धारगड पाऊलवाटेने रात्रीच्या वेळी जय भोलेचा गजर करीत भाविक मार्गक्रमण करतील. धारगड येथे पोहचल्यानंतर प्रारंभी गडावरून नेहमी पाण्याची भक्तावर जणू नैसगिक जलाभिषेक करते. निसर्गाने केलेली भक्तांची पूजा प्रत्यक्ष अनुभवण्यासारखीच असते. येथून पुढे शार्दूलबुवाची टेकडी चढून दुपारपर्यंत एकेरी रस्त्याने नरनाळा किल्यावर तेथून हनुमान गड येथील भंडाऱ्याचा लाभ घेतल्यानंतर शिवभक्त किल्ल्यावरून शहानूर येथे खाली उतरणार. काही कुटुंब खटकालीमार्गे सोमवारला थेट वाहनाने धारगडला जाऊन दर्शन घेणार आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यात्रे दरम्यान कोणतेही वाद्य (ढोल, ताशे डफडे इ.) लाउड स्पिकर वापरण्यास तसेच सोबत बाळगण्यास प्रतिबंध राहणार असून तत्सम साहित्य आढळून आल्यास जप्त करण्यात येणार आहे. तंबाखु गुटखा, बिडी, मद्य इत्यादी नशेच पदार्थ व शस्त्र वापरण्यास व सोबत नेण्यास यदि राहणार आहे. खटकाली तपासणी नाक्याकडुन दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वा. पर्यंत भाविकांना प्रवेश राहणार आहे. त्यानंतर कोणत्याही वाहनास प्रवेश देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात

अकोटपासून २५ कि.मी.वरील पूर्णा नदीच्या जलानी भरलेली कावड खाद्यांवर घेऊन भक्तगण अकोटवरून पोपटखेड मार्गाने जात लहान व मोठया महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करणार आहेत. धारगड अकोटवरून पाऊल वाटेने सुमारे २५ कि.मी. तर प्रमुख मागांने ३७ कि.मी. दूर येते. बहुतांश शिवभक्त पाऊल वाटेनेच जाणार आहेत.

येणार. सुलाई नाला पर्यटकांसाठी दिनांक ३ व ४ सप्टेंबर व रोजा बंद राहणार आहे. अमोना मार्ग धारगड मंदिरावरुन नरनाळा किल्ल्याकडे पायी जाण्याचा मार्ग दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ते ४ सप्टेंबरच्या दुपारी १२ वाजेपर्यंत खुला राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. धारगड यात्रेला यावर्षीही वन व वन्यजीव विभागासह चिखलदरा पोलिस व अकोट ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून यात्रेसाठी भाविकांच्या आवागमनासाठी यावर्षी सुद्धा राज्य परिवहन महामंडळ आपली बस सेवा सज्ज ठेवणार असल्याची माहिती आहे. दरवर्षी या यात्रेचे आयोजन धारगड

आले ४ सप्टेंबर च्या सायंकाळी ६ वा पर्यंत खटकाली नाका येथून बाहेर निघणे भाविकांना बंधनकारक राहील. निर्धारित दिवसाव्यतिरिक्त इतर दिवशी धारगड मंदिरात प्रवेश प्रतिबंधीत राहणार धारगड टि पॉइंट येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात सेवा समिती ही करीत असते.(AKOLA NEWS NETWORK)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp