अकोला न्युज नेटवर्क दिनांक 18 जुलै :- शेती प्रधान देशातील विद्यार्थ्यांना शेती संबंधित विषयांवर आणि व्यवसायांवर कृतियुक्त काम करता यावे ही व्यावसायिक शिक्षणक्रमाचे मुलतत्व असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कृषि अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थांना नियमित विषयवार प्रत्यक्षिके व धडे गिरवले जातात. तथापि बदलत्या स्पर्धात्मक परिस्थितीत ग्रामीण पार्शभूमी असणाऱ्या विद्यार्थांना बाजारपेठ व विपणन विषयी अधिक मार्गदर्शन मिळावे या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व ऍग्रो ऑर्बिट हब प्रा. लि. यांचे संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्हिव च्या माध्यमातून कृषी विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका धोरणातून नुकतीच व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यात आली.
कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात अधिष्ठाता कृषी डॉ. श्यामसुंदर माने यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावसायिक व्यवहाराचे ज्ञान व्हावे यासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत इंटरनॅशनल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ऍग्रो ऑर्बिटच्या इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या कंपनी कडे कल दाखविला, ह्या उपक्रमा द्वारे विद्यार्थ्यांना शेती विषयक व्यवसायातील प्रॅक्टिकल ज्ञान प्राप्त करता येईल, कुठल्या कंपन्या भारतात व बाहेर या व्यवसायात आहेत, त्यांचे प्रॉडक्ट कुठले आणि कुठल्या सीजन मध्ये कुठल्या पिकांवर कुठल्या औषधांनी फवारणी केली जाते व कृषी केंद्र त्या बाबतीत शेतकऱ्यांची कशी मदद करू शकतात याची सखोल माहिती ते ह्या इंटर्नशिप च्या माध्यमातून मिळवू शकतात. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडणायसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे व त्यांचे सहकारी डॉ. रोहित तांबे यांच्या पुढाकारासहित ऍग्रो ऑर्बिट हब प्रा. लि. चे संचालक श्री. महेश बजाज, संचालक श्री. सोमेश बजाज, श्री. मधुर अग्रवाल सोबतच रश्मी, मंजू, गौरी, डॉली, सुजय, ज्योतिष, कृष्णा, प्रवीण व इतर ऍग्रो ऑर्बिट टीमचे सदस्यांनी सदर उपक्रम यशस्वीपणे राबवीला.