ANN अकोला नेटवर्क ब्युरो दि. 8 जुन :- दुरदर्शनवर तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ वृत्तनिवेदन करणाऱ्या गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. दूरदर्शनवरील पहिल्या इंग्रजी वृत्तनिवेदकांपैकी त्या एक होत्या. सन १९७१ मध्ये त्या दूरदर्शनवर रुजू झाल्या होत्या. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदनाचा पुरस्कार मिळाला होता.
उत्कृष्ट कार्य, योगदान आणि उत्तम कारकिर्दीसाठी त्या सन १९८९ मध्ये सर्वोत्कृष्ट महिलांसाठी दिल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. देणगीदारांची प्रमुख संस्था असणाऱ्या ‘वर्ल्ड वाइड फंड, भारत’ संस्थेच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
गीतांजली अय्यर यांच्याबद्द्ल …
गीतांजली अय्यर यांनी कोलकाता येथील लोरेटो कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमाही केला. त्या देशातील पहिल्या इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक होत्या.
अय्यर 1971 मध्ये दूरदर्शनवर रुजू झाल्या आणि चॅनलमधील कारकिर्दीत चार वेळा त्यांना सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला. 1989 मध्ये त्यांना उत्कृष्ट महिलांच्या सन्मानार्थ दिला जाणारा इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कारही मिळाला.
वृत्त उद्योगातील दीर्घ कारकीर्दीनंतर, त्यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, सरकारी संबंध आणि विपणन क्षेत्रात प्रवेश केला. त्या भारतातील ‘वर्ल्ड वाइड फंडा’ च्या प्रमुख देणगीदारांच्या प्रमुख होत्या. श्रीधर क्षीरसागर यांच्या ‘खानदान’ या टीव्ही मालिकेतही त्यांनी काम केले होते.
याशिवाय जाहिरात क्षेत्रातही त्या सक्रियपणे वावरल्या. गीतांजली यांनी त्या काळातील अनेक ब्रँडसाठी काम केले होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता विश्वात शोकळला पसरली आहे.इ