Saturday, September 14, 2024
Homeक्राईमचक्क लाच 'खाल्ली'..!! रंगेहाथ पकडला जाताच तलाठ्याने तोंडात कोंबल्या ५०० च्या नोटा…

चक्क लाच ‘खाल्ली’..!! रंगेहाथ पकडला जाताच तलाठ्याने तोंडात कोंबल्या ५०० च्या नोटा…

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २५ जुलै २०२३ – Bribe Case, Man eats money notes: लाच खाणं हा भारतात गुन्हा असला तरी बहुतांश ठिकाणी लाचखोरी नियमित कार्यक्रम असल्यासारखी सुरू असते. सरकारी कार्यालयातील लाचखोरीची अनेक प्रकरणं दररोज समोर येत असतात. सध्याही लाचखोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने चक्क लाचेची रक्कम तोंडात टाकली आणि चावून खाल्ली. अधिकारी लाच घेताना लोकायुक्तांच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि लाचेची रक्कम तोंडात टाकून गिळली. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यावरही एक वेगळीच घटना घडली. या घटनेची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

रंगेहाथ पकडल्यानंतर पटवारीने लाचेचे 5 हजार रुपये चघळले!

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात बिल्हारी हलका गावात तैनात पटवारी गजेंद्र सिंह यांनी तक्रारदार चंदन सिंह लोधी यांच्याकडे एका जमिनीच्या प्रकरणात पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत चंदनसिंग लोधी यांनी लोकायुक्त जबलपूर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर लोकायुक्तांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पटवारीला लाच घेताना रंगेहाथ पकडले. मात्र पटवारी गजेंद्र सिंग याने लाच म्हणून घेतलेल्या ५००-५०० च्या नोटा तोंडात कोंबल्या.

https://www.instagram.com/reel/CvHIp_tAYFV/?igshid=MzRlODBiNWFlZA==

पुढे काय झालं?

या दरम्यान लोकायुक्तांच्या 7 सदस्यांच्या पथकाने नोटा काढून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तोंडातून पैसे न काढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अथक परिश्रमानंतर पटवारी गजेंद्र सिंग याने लाचेच्या चघळलेल्या नोटा बाहेर काढल्या. ही घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

व्हॉईस रेकॉर्डिंग, इतर पुराव्यांच्या आधारे कारवाई

लोकायुक्त टीमचे नेतृत्व करणारे कमलसिंग उईके सांगतात की, तक्रारदार चंदन लोधी यांच्या तक्रारीवरून लाच घेणारा पटवारी गजेंद्र सिंग याला 5 हजार रुपयांसह पकडण्यात आले, मात्र टीमला पाहून त्याने ती नोटा खाल्ल्या. टीमकडे व्हॉईस रेकॉर्डिंगसह इतर पुरावे आहेत, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल. सध्या आरोपी गजेंद्र सिंह याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp