अकोला न्यूज नेटवर्क, सागर भलतिलक, प्रतिनिधी बोर्डी, दिनांक ०४ ऑगस्ट २०२३ :-गेल्या आठवड्या पासून सुरू असलेला संततधार पाऊस तसेच वातावरणातील ढगाळ वातावरणाने तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून कपाशी  पिकांवर एक नवीनच संकट उभे राहिलेले आहे,एदलापूर परिसरात आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून कपाशीचा झाडांची पाने निस्तेज पडली असून ती सुकायला लागली आहे.या संकटामुळे कापूस उत्पादक शेतकरी  हवालदिल होतांना दिसत असून.यासंदर्भात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करणे गरजेचे  आहे.

भारताची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. यातच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती ही पाचवीला पूजलेलीच आहे.वरून कष्टाने हाता तोंडाशी आलेल्या उत्पन्नाला देखील शासन हमीभाव देत नाही. यंदाच्या खरीप हंगामात कपाशी ची लागवड करून थोडे फार आर्थीक संकट टळेल या आशेत बळीराजा होता.तरीही मोठ्या हिमतीने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली.परंतु सतत चा पाऊस, वातावरणातील दमटपणा अशा प्रतिकूल वातावरणाचा फटका आता कपाशीच्या पिकाला बसला असून कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने तसेच रोगाचे प्रमाण या भागात वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

एदलापूर परिसरात सुरवातीला दोन शेतकऱ्यांना त्यानंतर  जवळपास सात ते आठ  शेतकऱ्यांच्या कपाशी पिकांना या रोगाचा फटका बसला असून.रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे,प्रभावग्रस्त झाडे ही उपटली असता सहज हातात येत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे असून परिसरातील शेतीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई ची मागणी शेतकरी करतांना दिसत होते.

प्रतिक्रिया
माझ्याकडे सात एकर शेती असून त्यापैकी दोन एकर च्या प्लॉट मध्ये मान्सूनपूर्व कपाशी पिकाची लागवड केली आहे,सुरवातीला पिन चांगले होते,मात्र गेल्या १५ दिवसांपासून कपाशीवर मर रोगासह बुरशीचा प्रादुर्भावाने पाने लाल पडून जळायला लागली आहेत, बुरशीनाशकाची फवारणी केली तरीही काहिच फरक पडला नाही,
राहुल तराळे ,शेतकरी गट नं १०९(१)रा. एदलापूर

प्रतिक्रिया
यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं कापसाची झाडे मोठ्या प्रमाणात मरत  आहेत. अशात कापसाचे पीक कसे वाढवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. 
सागर कोल्हे ,शेतकरी रा.एदालापूर

प्रतिक्रिया
रोगाचा मर आहे का फिजिओलॉजीकल हे आधी पहावे लागणार,कारण दोन्हीच्या उपाययोजना वेगवेगळ्या आहेत,प्रादुर्भाव अधिक असेल तर विद्यापीठाची टीम या शिवारात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार.जर रोग बुरशीजन्य असेल तर तशी शिफारसही शेतकऱ्यांना सांगण्यात येणार,
सुशांत शिंदे, तालुका कृषी अधिकारी


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!