Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीघरच्यांचा प्रेमाला विरोध पारडीतील प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेत संपवलं जीवन...

घरच्यांचा प्रेमाला विरोध पारडीतील प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेत संपवलं जीवन…

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४:- घरून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाचे विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना वर्ध्याच्या तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पारडी येथे घडली आहे.पारडी येथे एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महल्या केलेल्या प्रेमीयुगुलामध्ये मुलगी अल्पवयीन आहे. विहीरीत प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन जीवन संपवलं. प्रेमसंबंधाला विरोध असल्याने दोघांनी एकत्र राहू शकत नाही तर एकत्र जीवन संपवू टाकू, असा निर्णय घेत विहीरीत उडी घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

घरून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाचे विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना वर्ध्याच्या तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पारडी येथे घडली आहे. दोघेही कुटुंबीयांचा विरोध झुगारून पळून गेल्याची माहिती आहे. मृतकामध्ये हर्षल वाघाडे या 23 वर्षीय तरुणाचा समावेश आहे तर मुलगी अल्पवयीन आहे. दोघांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

कुटुंबियांचा विवाहाला विरोध असल्याने घर सोडले
हर्षल वाघाडे असे 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो सध्या पारडी येथे राहत होता. हर्षलचे तेथीस एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. परंतु दोघांच्या प्रेमसंबधा दोघांनी पळून जाण्याचा घाट घातला. मुलगी अल्पवयीन असल्याने लग्न करणे शक्य नव्हते त्यामुळे दोघेही निराश होते. घरून पळून जात परिसरातील जंगलात त्यांनी निवारा शोधला असावा असा कयास लावला जात आहे. कुटुंबियांचा विवाहाला विरोध असल्याने दोघांनी पळ काढला. याबाबत 23 जानेवारीला तळेगाव श्यामजी पंत पोलीस ठाण्यात कुटुंबियाकडून तक्रार दाखल करण्यात आली. घरच्यांनी शोध घेतला पण दोघाचाही थांग पत्ता लागला नव्हता, अखेर आज शनिवारी पारडी शिवारातील एका विहिरीत दोघांचेही मृतदेह आढळून आले आहे.

वर्ध्यात मोठी खळबळ
हे दोघेही तरुण आणि तरुणी एकाच परिसात राहत असून गेल्या दोन अनेक दिवसांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मुलगी अल्पवयीन आहे. या प्रेमसंबंधांना घरच्यांकडून विरोध होता. अनेक वेळा कुटुंबियांनी दोघांना परस्पर समजही दिली होती. मात्र आपल्या प्रेमाला विरोध असून आपला विवाह होणार नाही, या भावनेतून दोघेही घराबाहेर पडले. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ते सापडले नाही. त्यानंतर त्यांचा मृतदेह विहीरीत आढळून आला. या घटनेमुळे वर्ध्यात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले असून नातेवाईकांची रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!