Saturday, January 18, 2025
Homeक्रिडा विश्वIND vs PAK: वनडे वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची तारीख बदलणार; अचानक...

IND vs PAK: वनडे वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची तारीख बदलणार; अचानक झालं तरी काय

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ जुलै २०२३ :-भारतात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी वनडे वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर असतील. आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर केले असून त्यानुसार १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे ही मॅच होणार आहे. पण आता भारत आणि पाकिस्तान सामन्यावर मोठी अपडेट आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून या सामन्याची तारीख बदलण्याबाबत गंभीर विचार सुरू आहे. ही लढत १५ ऑक्टोबरला होणार आहे आणि त्याच दिवसापासून नवरात्र सुरू होत आहे. अहमदाबादसह संपूर्ण गुजरातमध्ये नवरात्री मोठ्या उत्साहात आणि भव्य साजरी केली जाते. अशा वेळी सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला या सामन्याची तारीख बदलण्याचा सल्ला दिला आहे.

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जर बीसीसीआयने सामन्याची तारीख बदलली तर ज्या चाहत्यांनी विमानाचे तिकीट आणि हॉटेल रुम बुक केली आहेत त्यांना मोठा झटका बसू शकतो. भारत- पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. ब्रॉडकास्टर्सची देखील चांदी होत असते कारण या सामन्याला सर्वाधिक टीआरपी मिळत असतो. सीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली की, आम्हाला सुरक्षा यंत्रणांकडून असे सांगण्यात आले आहे की, भारत आणि पाकिस्तान सारख्या हायप्रोफाईल मॅचसाठी लाखो लोक अहमदाबादला येतील. नवरात्रीमुळे ही लढत पुढे आयोजित करता येऊ शकतो. आम्ही आमच्याकडील सर्व पर्यायांचा विचार करत आहोत आणि यावर लवकरच निर्णय घेऊ.

गेल्याच महिन्यात आयसीसीने वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले होते. एक लाख प्रेक्षकांची क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होणार आहे. या मैदानावर स्पर्धेतील चार मोठ्या लढती होणार आहेत. ज्यात न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारत विरुद्ध पाकिस्तान आणि अंतिम सामन्याचा समावेश आहे. १० शहरात होणाऱ्या वर्ल्डकपमधील सेमीफायनलच्या लढती मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत. दरम्यान, मंगळवारी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी वर्ल्डकपचे आयोजन होणाऱ्या सर्व राज्य बोर्डाची बैठकी बोलवली आहे. या बैठकीत अहमदाबाद संदर्भातील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. तसेच नवी तारीख कोणती निवडता येईल याचा विचार केला जाईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp