अकोला न्यूज नेटवर्क स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी पातुर दिनांक ०८ सप्टेंबर २०२३ :-पातुर- अकोला मार्गावर नांदखेड फाट्या नजीक दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पातूर- अकोला मार्गावर चिखलगाव ते नांदखेड नजीक एम.एच.30 एजी 7235 व एम.एच.30 एपी 3831 क्रमांक असलेल्या दोन दुचाकीचाकी समोरासमोर धडकल्याने जबरी अपघात झाला असून यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यापैकी पिंटू रमेश तेजवाल (वय 35) व शे.इमरान शे. रुस्तम (वय 28) हे अतिगंभीर असून लखन मोहन पवार (26), सोफियान खान अयुब खान (वय 24) हे सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस घटनास्थळ गाठले असता प्रथम पाहणी केली असता जखमी गंभीर अवस्थेत पडून होते व 108 रुग्णवाहकेला संपर्क केला असता रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता पोलीस वाहनाचे चालक केकन मेजर,होमगार्ड सैनिक प्रशांत हरणे, पत्रकार दुले खान,पत्रकार स्वप्निल सुरवाडे यांनी जखमींना शासकीय पोलीस वाहनातुन सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे उपचारार्थ दाखल केले.यावेळी

अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमलेली होती व या बघ्यांच्या गर्दीमध्ये कोणाचीही मदतीची मानसिकता नव्हती अशात शेतकरी पुत्र असलेले शेतकरी संघटनेचे अविनाश नाकट पाटील त्या मार्गावरून जात असतांना त्यांना सदर अपघात दिसून आला असता त्यांनी या अपघातामध्ये अतिगंभीर असलेल्या पिंटू तेजवाल याला आपल्या खाजगी वाहनातून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करून माणुसकीचा परिचय दिला.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!