Friday, May 3, 2024
HomeकृषीFarmer Suicide निवडणुकीच्या वादळात शेतकऱ्याचे जीवन मात्र अंधारात! कर्जबाजारी शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी...

Farmer Suicide निवडणुकीच्या वादळात शेतकऱ्याचे जीवन मात्र अंधारात! कर्जबाजारी शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली,

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ६ एप्रिल :- Farmer Suicide विदर्भातील शेतकऱ्याचे जीवन जगणे म्हणजे निसर्गाने तोंड दाबून बुक्या मारल्या सारखे झाले आहे आज काल ची शेती ही शेती राहिली नसून ऐक जुवा झाला आहे शेतकरी घाम गाळून पै आन पै साठवून ठेवलेली रक्कम शेतीच्या पिका करीता लावतो पैसा कमी पडला की मग सावकार नाही तर बँके कडे लोन स्वरूपात मागतो आणि मग याच चक्रव्ह्यूवात असा काही गुरफटला जातो त्यातून तो बाहेर पडतो तो आपला जीव देऊनच अशीच एक घटना आज बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

सद्या जिकडे तिकडे निवडणुकीचे वारे वाहत आहे प्रत्येक पक्ष हा आपला उमेदवार कसा निवडून येईल त्या करीता पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहे पण याच आपल्या कृषी प्रधान देशात शेतकरी मरतो आहे या कडे कुणाचेच लक्ष नसल्याची केविलवाणी थट्टा Farmer Suicide दिसून येत आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अतंर्गत येणाऱ्या कोठारी या गावातील शेतकरी ६० वर्षीय वसंता सखाराम सराटे याच्या कडे शेती होती आपल्या शेतीत धान्य पिकवून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत असत शेती करण्यासाठी पैसा अपुरा पडल्याने त्यांनी बँकेचे कर्ज काढले होते.

पण निसर्ग कोपला आणि होत्याचे नव्हते झाले. पीक हातचे गेले आणि डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे राहिले त्यात मार्च महिना झाला आणि तरी देखील बँके कडून घेतलेली कर्जाची रक्कम फेडण झाली नाही बँकेवाल्यानी वसुली साठी तगादा लावला आणि आज दुपारच्या सुमारास वसंता सखाराम सराटे यांनी टोकाचा निर्णय घेऊन धोतर्डी ते यावलखेड दरम्यान रेल्वे रुळावर रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या केली. Farmer Suicide

रेल्वे रुळावर एका इसमाचा मृतदेह पडला असल्याची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस घटनास्थळी दाखल झाले अधिक तपास केला असता वरील संपूर्ण प्रकार समोर आला बोरगाव मंजू पोलिसांनी मृतेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला सर्वोपाचार रुग्णालय येथे पाठविण्यात आला अधिक तपास सुरू आहे.

Farmer Suicide निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न कुठे?

या घटनेने एका शेतकऱ्याचे दुःखद जीवन जगण्याची आणि मृत्यूला सामोरे जाण्याची कथा उघड केली आहे. निवडणुकीच्या वादळात राजकीय पक्ष उमेदवार निवडून आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत. पण याच देशातील अन्नदाते शेतकरी कर्जापासून त्रस्त होऊन आत्महत्या करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!