Saturday, April 13, 2024
Homeब्रेकिंगखळबळजनक! जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन जीआरपीच्या ताब्यात

खळबळजनक! जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन जीआरपीच्या ताब्यात

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ३१ जुलै२०२३ :-जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी आरपीएफ जवान चेतनला अटक केली आहे.

जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना ही जयपूर-मुंबई एक्स्प्रेसच्या बी-5 बोगीमध्ये गोळीबाराची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन याने एएसआय टिकाराम यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे.त्यानंतर आरपीएफ जवान चालत्या रेल्वे गाडीतून उडी मारून फरार झाला.त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!