Thursday, May 23, 2024
Homeताज्या घडामोडीदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी परीक्षेचे हॉल तिकीट

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी परीक्षेचे हॉल तिकीट

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ३० जानेवारी २०२४:- दहावी, बारावीच्या मुलांसाठी फेब्रवारी, मार्च महिना महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे. यावर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाने काही महत्वाचे बदल केले आहेत. हे बदल विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. आता बोर्डाने विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करुन दिले आहे. दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून (३१ जानेवारी) विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

कधीपासून आहे परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारपासून दहावीचे हॉल तिकीट जारी करणार आहे. आता दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तसेच लेखी परीक्षेला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उद्यापासून हॉल तिकीट देण्यात येणार आहे. या हॉल तिकीटासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे आदेश बोर्डाने विद्यालयांना दिले आहेत.

यंदापासून हा बदल
बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाचा बदल केला आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून झालेल्या मागणीनुसार परीक्षाचा वेळ दहा मिनिटांनी वाढवून दिला आहे. तसेच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धातास आधी परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे. म्हणजे सकाळी ११ वाजता परीक्षा सुरु होणार असेल तर विद्यार्थ्यांना १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे. तसेच दुपारी ३ वाजता परीक्षा असेल तर विद्यार्थ्यांना २.३० वाजता परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे, असे परीक्षा मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.

सीबीएसईकडून असा बदल
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत काही बदल करण्यात आले. सीबीएसई बोर्ड आता विद्यार्थ्यांना गुणांची टक्केवारी देणार नाही. तसेच श्रेणीसुद्धा देणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढू नये, यामुळे हा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयात प्रवेश घेताना संबंधित शैक्षणिक संस्था गुण किंवा श्रेणी विद्यार्थ्यांना देणार आहे. तसेच नोकरीसाठी संबंधित संस्था टक्केवारी काढणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!