अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १० ऑगस्ट २०२३ स्वप्नील सुरवाडे प्रतिनिधी पातूर :- अकोला ते वाशिम मार्गावर एसटी बस चालकांची मनमानी दिवसा दिवस वाढतच चालली आहे. मालेगाव व मेडशीहून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मालेगावात आकोला फाटा तर मेड़शीत बस स्टैंड वर अधिकृत बस थांबा असताना देखील विद्यार्थया द्वारा हात दाखवल्यानंतरही एसटी बस चालक बस थांबवत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
एकाकळी केंद्र व राज्य सरकार मुलींच्या शिक्षणावर भर देत “बेटी बचाव बेटी पढाओ” ही बाब समाजात क्रियान्वित करण्यासाठी प्रयत्न घेत आहे मात्र एसटी बस चालक आपल्या मनमानी मुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या बट्ट्याबोळ करीत आहे.पातुर स्थित शाहबाबू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मालेगाव, मेडशी सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी येत आहे, परिवहन मंडळाने सुद्धा या विद्यार्थ्यांना अहिल्याबाई होळकर योजने अंतर्गत शिक्षण प्राप्त करण्यासाठी बसची पासेस उपलब्ध करून दिलेली आहे.मालेगांवहुन येताना मात्र बस चालकांच्या माथेफिरू प्रवृत्तीमुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
10 ऑगस्ट रोजी जेव्हा तीन ते चार बस चालकांनी विद्यार्थ्यांनी द्वारे मालेगांव अकोला फाटा येथे हात दाखवल्यानंतर ही बस थांबवली नाही तेव्हा मुलींनी मुख्याध्यापक व शिक्षकांना संपर्क साधून हकीकत सुनवली, तेव्हा यांनी गांधीवादी अंदाजात या बस चालकांना व बस वाहकांना पुष्पगुच्छ देऊन अधिकृत बस थांबावर बस थांबविण्यासाठी विनंती केली वा विद्यार्थिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर न काढण्याचे आग्रहा व विनंती केली.
गुरुवारी मालेगाव व मेडशी येथे जय बस चालकानी बस थांबली नाही त्यामध्ये अकोला आगारची नांदेड अकोला बस क्र.MH 20 BL 4151, परतुर आगार ची परतुर अकोला बस क्रमांक MH-14 BT1934, जिंतूर आगाराची जिंतूर अकोला बस क्रमांक MH20 BL 2529 या बसेसच्या समावेश आहे. पालक विद्यार्थी व शाळेनी या आधी विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ विभाग अकोला तसेच आगार व्यवस्थापक वाशिम, अकोला ,मालेगाव, पातुर यांना बस चालक बस थांबवित नसल्याबाबतची तक्रार सुद्धा दिली आहे, बस चालक बस थांबित नसल्यामुळे पालकांमध्ये चिंता व आक्रोश दिसून येत आहे.