Saturday, September 14, 2024
Homeब्रेकिंगमहाप्रसादाला नेतो सांगत शेतात नेलं आणि. तरूणीवर सामूहिक अत्याचार

महाप्रसादाला नेतो सांगत शेतात नेलं आणि. तरूणीवर सामूहिक अत्याचार

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ३१ जानेवारी २०२४ :- महाप्रसादाला नेतो असे सांगत एका 23 वर्षांच्या तरूणीला शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची अतिशय घृणास्पद घटना अमरावतीमध्ये घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील मालखेड येथे हा गुन्हा घडला असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी पाच आरोपींविरोधात अपहरण आणि अत्याचाराच गुन्हा दाखल करत त्या नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

पाच नराधमांनी केला अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी मालखेड येथील रहिवासी आहेत. आरोपींपैकी एक जण हा पीडितेच्या कुटुंबियांच्या ओळखीचा आहे. त्यानेच पीडित तरूणीला महा प्रसादकरिता मालखेड येथे नेतो असे सांगितलं आणि तिला घेऊन तो घरी गेला. रात्रभर त्याने तिला घरीच ठेवले. त्यानंतर 28 तारखेला तो तरूणीला गावी सोडण्यासाठी निघाला, त्याने तिला बाईकवर बसवले. मात्र गावी न नेता तिला शेतात नेले आणि तेथे एका खोलीत नेऊन त्याने एका मित्रासह तिच्यावर अत्याचार केला.

तेवढ्यात तिकडे इतर तीन आरोपीही आले आणि त्यांनीही तिच्यावर अत्याचर केला. पीडितेने त्यांना विरोध करण्याचा, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. शेतात त्यांच्याशिवाय कोणीच नसल्याने पीडितेला कोणाचीही मदत मिळाली नाही. याप्रकरणी तोंड उघडलं तर जीवानिशी मारू अशी धमकीही आरोपींनी दिली.

आरोपींना अटक त्यानंतर पीडित तरूणीने तिथून कसाबसा जीव वाचवत पळ काढला आणि घर गाठले. कुटुंबियांना तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला असता, त्यांना मोठा धक्का बसला. मात्र त्यांनी हिंमत न हारता, पीडितेला पाठिंबा दिला आणि लगेच शेंदूर जनाघाच पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्याआधारे 29 जानेवारी रोजी पोलिसांनी अपहरण व अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींचा तातडीने तपास करून पोलिसांनी त्या पाचही नराधमांना अटक केली. मात्र या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp