अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑगस्ट २०२३ :-सबसे कातील गौतमी पाटील’ हे असं वाक्य होतं जे गेल्या काही दिवसांपासून खुप चर्चेत होतं. नृत्यांगना असलेली गौतमी ही नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते.तिच्या डान्स शोला चाहत्यांची तुफान गर्दी होते. मात्र गेले काही दिवस गौतमीची चर्चा कमी झाली होती. तिचे शो देखील बंद होते.बऱ्याच दिवसांनंतर काल 1 ऑगस्टला गौतमी पाटीलचा शो अहमदनगरच्या नागापूरमध्ये झाला. यावेळी नेहमी प्रमाणे तिच्या शोमध्ये तरुणांची तुफान गर्दी झाली होती. अगदी लहान मुलांपासून महिला आणि वृध्दांपर्यंत सर्वच या कार्यक्रमात आले होते.
Bigg Boss OTT2 : ‘तू फक्त माझ्या डोळ्यात बघ, तुला मनिषाला पाहिलं अन् महेश भट्ट वय विसरले!नवनागापूरच्या सरपंचाच्या नातीचा वाढदिवस होता. यावेळी नातीचा वाढदिसानिमित्त गौतमीला बोलावण्यात आलं होतं. तिचा डान्स सुरु असतांनाच कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ सुरु केला. तर काहींनी किरकोळ दगडफेक केली.त्या कार्यक्रमात दगड लागल्यामुळे एक महिला देखील जखमी झाली. असं सांगण्यात आलं. काही मुलांनी कार्यक्रमात गोंधळ घातल्यानं एमआयडीसी पोलीस आणि खासगी बाऊन्सर्स यांनी लगेचच वातावरण शांत केलं मात्र त्यानंतर डान्स शो पुन्हा सुरु करण्यात आला नाही.
गौतमीचा शो तिथेच बंद करण्यात आला. मराठी माणसाने पाहिलेलं सर्वात मोठं स्वप्न ND स्टुडिओ, नितीन देसाई यांनी राखेतून उभारलेलं साम्राज्य गोंधळामुळे कार्यक्रम रद्द झाल्यानंतर गौतमी पाटीलं तिची प्रतिक्रिया देखील दिली. यावेळी बोलतांना गौतमीनं म्हणाली की, ‘आज खुप दिवसांनी माझा कार्यक्रम झाला. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांची खुप गर्दी असते. त्यामुळे मागच्या प्रेक्षकांना डान्स दिसत नाही.त्यामुळे थोडा गोंधळ झाला. कार्यक्रम छान झाला मात्र गोंधळामुळे मी कार्यक्रम लगेच बंद केल. मी प्रत्येक आयोजकाला चांगल्याप्रकारे आयोजन करा. कार्यक्रमात बंदोबस्त व्यवस्थित प्रकारे करा. ज्यामुळे असा गोंधळ मारफेक होणार नाही. जर कार्यक्रमात असाच गोंधळ होत असेल तर मी यापुढे कार्यक्रम करणार नाही. कार्यक्रम करणं बंद करेल.’जर कार्यक्रमाचं आयोजन व्यवस्थित नसेल तर गौतमी यापुढे तिचे डान्स शो करणार नाही असा स्पष्ट इशारा तिनं यावेळी दिला.कोकणातलं निसर्गरम्य बालपण त्यांच्यातला जागतिक दर्जाचा कलाकार घडवून गेलं
गौतमी पाटील बद्दल बोलायचं झाल तर लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांन तिने भुरळ घातली आहे. तिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी असते. अश्लिल हावभाव आणि डान्स स्टेपमुळे ती चर्चेत आली होती. तिच्यावर टिका देखील करण्यात आली.त्यानंतर जाहिररित्या माफी मागत अशी चुक पुन्हा होणार नाही असं गौतमीनं सांगितलं होतं. तिने तिच्या डान्समध्येही खुप बदल केला. गावोगावी डान्स शो करणारी गौतमी आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे.बाबा गायकवाड यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या ‘घुंगरू’ सिनेमात ती दिसणार आहे. घुंगरू सिनेमात गौतमी लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसणार आहे.