Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीफोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये नोट ठेवणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे मोबाईलचा स्फोट होऊन तुमचं खूप नुकसान होऊ शकतं.मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. आजच्या काळात लोकांना पर्स सोबत नेणं आवडत नाही. पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल राहतो. लोक पर्समध्ये पैसे ठेवतात. मात्र ऑनलाइन व्यवहार सुरू झाल्यापासून लोकांना रोख रकमेची गरज नाही. यामुळे लोक फार कमी वेळा पर्स ठेवतात. पण लोक कधी अचानक कॅशची गरज लागू शकते, असा विचार करून आपल्याजवळ थोडे पैसे ठेवतात.

मोबाईलच्या कव्हरमध्ये पैशाच्या नोटा ठेवता का
मोबाईल कव्हरमध्ये नोट ठेवणं घातक कसं ठरेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?.जाहिरातजर तुम्ही फोन कव्हरमध्ये पैसे ठेवत असाल तर सावध राहा. कारण फोन बराच वेळ वापरल्यास तो खूप गरम होतो. फोनचा प्रोसेसर वेगाने काम करतो तो फोनचं तापमान नियंत्रित करतो. जर तुमचा मोबाईल खूप गरम झाला तर त्यात ठेवलेली नोट तुमच्यासाठी घातक ठरू शकते. गरम फोन कागदी नोटला आग लावू शकतो आणि त्यामुळे तुमचा मोबाईल काही वेळातच जळून राख होऊ शकतो. असे अनेक लोक कमेंट करू लागले, जे वर्षानुवर्षे कव्हरमध्ये पैसे ठेवत आहेत. अनेकांनी भविष्यात तसं करणार नसल्याचं सांगितलं. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलं की, ते अनेक वर्षांपासून हे करत आहेत पण आजपर्यंत मोबाईलला आग लागली नाही. तुम्हालाही अपघात टाळायचे असतील तर भविष्यात असं करू नका.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp