अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०८ ऑगस्ट २०२३ :-प्रेयसीसोबत पिझ्झा डेटवर गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. पिझ्झा घेऊन प्रेयसीला भेटायला जाणं तरुणाच्या जीवावर बेतलं. तरुणाच्या मृत्यूनं त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली.टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, २० वर्षांचा मोहम्मद शोएब एका बेकरीत काम करायचा. त्याच्या प्रेयसीनं पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली. प्रेयसीची इच्छा पूर्ण करण्यासाठी शोएब पिझ्झा घेऊन तिच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला. शोएब आणि त्याची प्रेयसी तिसऱ्या गच्चीत उभे राहून पिझ्झा खात होते. दोघांच्या गप्पा सुरू होत्या.

प्रेयसीसोबत पिझ्झा खाणाऱ्या शोएबला अचानक दबक्या पावलांचा आवाज ऐकू आला. प्रेयसीचे वडील गच्चीवर येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आपण पकडले जाऊ अशी भीती त्याला वाटू लागली. तो गच्चीच्या एका भागात लपायला गेला. एका वायरच्या मदतीनं तो लपण्याचा प्रयत्न करत होता.

तितक्यात तो तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली पडला.तरुण तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याची बातमी आसपासच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्याला उस्मानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. यानंतर शोएबच्या वडिलांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.(AKOLA NEWS NETWORK )


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!