अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४:- बरेच महिने ब्रेक लागलेल्या गोवंश कारवाई आज समोर आली असून एक दोन नव्हे तर चक्क २५ गोवांशना जीवनदान देण्यात अकोला स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाला यश आले असून या करावीत पोलिसांनी १९ लाख ४ हजारांच्या मुद्देमाला सह एक आरोपीस ताब्यात घेतले.
गोवंश कत्तलिवर बंदी असून देखील तस्कर छुप्या पद्धतीने गोवंश चोरी करून त्यांची कत्तल करीत होते. मात्र पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्या मुळे हे गोवंश तस्कर नाहीसे झाले होते मात्र पोलिसांची पकड कमी होताच रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत परत हे तस्कर सज्ज झाल्याची गुप्त माहिती अकोला स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी मिळाली माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने आज सकाळच्या सुमारास रामदास पेठ हददीतील कागजी पुरा व मोमीन पुरा भागात नाकाबंदी करून गोवंश जनावरे कत्तली करीता घेवुन येणारा दोन चार चाकी मालवाहू वाहणे पकडले त्यात पाहणी केली असता त्या मध्ये २५ गोवंश जातीचे जनावरे ज्याची किंमत अंदाजे ५, लाख ४ हजार असून वाहतुकी करीता वारपरण्यात आलेली १४, लाख रुपयाची दोन वाहने असा एकूण १९, लाख ४ हजाराचा मुददेमाल हस्तगत करून आरोपी मोहम्मद सुफीयान मोहम्मद नासीर वय २१ वर्ष राहणार खडकपुरा जुनी वस्ती यास रामदास पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
तसेच नमुद गोवंश पुढील संगोपणा करीता आदर्श गौशाळा म्हैसपुर, अकोला येथे पाठविण्यात आले. ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उप निरीक्षक गोपाल जाधव, दशरथ बोरकर, फिरोज खान, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, गोकुल चव्हाण, रवि खंडारे, अब्दुल माजीद, सुलतान पठान, खुशाल नेमाडे, अवीनाश पाचपोर, महेद्र मलीये, शेख वसीमोददीन, इजाज अहमद, लीलाधर खंडारे, मोहोम्मद अमिर, अमोल दिपके, स्वप्नील खेडकर यांनी केली.