अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०८ ऑगस्ट २०२३ :-जगातील बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या दरात नरमाई दिसून येत आहे. देशांतर्गत वायदे बाजारासह सराफा बाजारातही आज सोने-चांदी स्वस्त झाले आहे. त्यामुळे जर आज तुम्ही खरेदीला बाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.आजचा सोने-चांदीचा भावदेशांतर्गत वायदे बाजारात सोन्याचा भाव ३० रुपयांनी घसरून ५९ हजार ३९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. याशिवाय MCX वर चांदी ४० रुपयांनी स्वस्त होऊन किंमत ७१ हजार २३० रुपये प्रति किलोपर्यंत घसरली आहे.
सोन्या-चांदीत नरमाईचे कारण म्हणजे यूएस फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नरचे विधान, ज्यात त्यांनी आगामी काळात दर वाढण्याचे संकेत दिले आहेत.दुसरीकडे सराफा बाजारातही सोने-चांदी किंची स्वस्त झाले आहे. ८ ऑगस्ट रोजी १० ग्रॅम सोन्याची किरकोळ किंमत अनेक शहरांमध्ये अंदाजे ६० हजार रुपये आहे. १० ग्रॅम २४ सोन्याची किंमत ६० हजार १६० रुपये तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५ हजार १५० रुपये आहे. याउलट चांदीची किंमतीत एक रुपयांची घसरण होऊन प्रति किलो चांदीचा भाव ७४ हजार रुपये प्रति किलोवर घसरला आहे. लक्षात घ्या की भारतातील सोन्याचा भाव सामान्यत: जागतिक आर्थिक परिस्थिती, चलनवाढीचा दर, चलनातील चढ-उतार आणि स्थानिक मागणी आणि पुरवठा गतीशीलतेसह विविध घटकांनी ठरवलं जातो.आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीआंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सराफाच्या किमतीत नरमाई दिसू असून कोमॅक्स वर सोन्याची किंमत घसरली आणि $१९७० च्या खाली आली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही घट झाली आहे. कोमॅक्सवर चांदी २३.२० डॉलर प्रति औंसवर आली आहे.