अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १५ ऑगस्ट २०२३:-ऑगस्ट महिन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या महिन्यात सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. दोन्ही धातूंना या महिन्यात मोठी उडी घेता आली नाही. सोने थेट 58,000 रुपयांच्या घरात आले. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीत मोठी घसरण झाली होती. जुलै महिन्यात सोने-चांदीची घौडदौड झाली होती. ऑगस्ट महिन्यात किंमती सूसाट धावतील असा अंदाज होता. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या किंमती वाढल्या होत्या. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात दोन्ही धातूंनी विक्रमाला गवसणी घातली होती. त्यानंतर मात्र तीन महिन्यात दोन्ही धातूंना कोणताही नवीन विक्रम करता आला नाही. ऑगस्ट महिन्यात दोन आठवड्यात किंमतींना लगाम लागला. सोने-चांदीत सातत्याने घसरण होत आहे. भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.
सोन्यात मोठी घसरण
या महिन्यात दोन आठवड्यात सोन्यात 1000 रुपयांची घसरण झाली. सोन्यामध्ये केवळ दोनदा वाढ झाली. 1 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी सोने वधारले तर 5 ऑगस्ट रोजी सोन्याने 200 रुपयांची उसळी घेतली. त्यानंतर भावात सातत्याने घसरण होत आहे. शनिवार, रविवार आणि मंगळवारी राष्ट्रीय सुट्टी आल्याने भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने भाव जाहीर केलेले नाही. गुडरिटर्न्सने सोने-चांदीचे भाव जाहीर केलेले आहे.
सोन्याचा भाव काय
गेल्या आठवड्यात 6,7 ऑगस्ट रोजी मोठी दरवाढ झाली नाही. 8 ऑगस्ट रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली. 9 ऑगस्ट रोजी पुन्हा 100 रुपयांची स्वस्ताई आली. 10 ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव 250 रुपयांनी कमी झाले. 11 ऑगस्ट रोजी सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले. 12,13,14 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 22 कॅरेट सोने 54,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,760 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.
डॉलरने केला रेकॉर्ड
अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या उपाय योजनांना अनुकूल परिणाम दिसून आला. डॉलर गेल्या एका महिन्यात दुडूदुडू धावला. डॉलरमध्ये 0.3 टक्के वाढ झाली. तर सोन्यात तितकीच घसरण झाली. सोने-चांदी महिनाभरात निच्चांकावर पोहचले आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 58,969 रुपये, 23 कॅरेट 58,733 रुपये, 22 कॅरेट सोने 54,016 रुपये, 18 कॅरेट 44,227 रुपये, 14 कॅरेट सोने 34,497 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,211 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
चांदी 5500 रुपयांची घसरण
ऑगस्ट महिन्यात चांदी स्वस्त झाली. चांदी 5500 रुपयांनी स्वस्त झाली. गेल्या आठवड्यात सोमवारी 100 रुपयांनी चांदी घसरली. मंगळवारी चांदी 1000 रुपयांनी उतरली. बुधवारी चांदीचा भाव 500 रुपयांनी कमी झाला. या किंमतीत 2100 रुपयांची घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 72,800 रुपये आहे.(AKOLA NEWS NETWORK )