अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १० फेब्रुवारी २०२४:- सोने आणि चांदीने या आठवड्यात ग्राहकांना दिलासा दिला. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सोने नरमले तर चांदी महागली. जानेवारीपासून या दोन्ही धातूत चढउताराचे सत्र सुरु आहे. पण दोन्ही धातूंनी दरवाढीचा नवीन उच्चांक गाठला नाही. डिसेंबर 2023 मध्ये आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मौल्यवान धातूंनी मोडले होते. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. बजेट 2024 नंतर मौल्यवान धातू भरारी घेतील असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण शेअर बाजाराप्रमाणेच सोने-चांदीला हा अर्थसंकल्प उशीरा कळणार असल्याचा टोला अनेक जणांनी हाणला. सध्या सोने स्वस्त तर चांदी किंचित महागली आहे. अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती
सोन्यात किंचित घसरण
या महिन्यात 1 आणि 2 फेब्रुवारीला अनुक्रमे 170 आणि 160 रुपयांनी किंमती वधारल्या. 3 फेब्रुवारीला सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले. 5 फेब्रुवारीला 150 रुपयांनी तर 6 फेब्रुवारीला 220 रुपयांनी सोन्यात घसरण झाली. 7 फेब्रुवारी रोजी त्यात 180 रुपयांची दरवाढ झाली. 9 फेब्रुवारीला 20 रुपयांनी भाव उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,040 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची दरवाढ
जानेवारी महिन्यात चांदीने दिलासा दिला होता. चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली होती. तर महिना अखेरीस त्यात 2 हजारांची वाढ झाली होती. 2 फेब्रुवारीला चांदी 200 रुपयांनी वधारली. 3 फेब्रुवारी रोजी भाव 1,000 रुपयांनी उतरले. 5 फेब्रुवारीला 300 तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी भाव कमी झाले. 7 आणि 8 फेब्रुवारीला बदल दिसला नाही. 9 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 62,624 रुपये, 23 कॅरेट 62,373 रुपये, 22 कॅरेट सोने 57,364 रुपये झाले. 18 कॅरेट 46,968 रुपये, 14 कॅरेट सोने 36,635 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,638 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.