अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ :- सोन्यात काल मोठी पडझड झाली. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने 800 रुपयांनी आपटले. तर चांदी पण घसरली होती. या तीन दिवसांचा विचार करता, सोने 900 रुपयांनी उतरले आहे. तर चांदीने दरवाढीचा जोर लावला आहे. सोने निच्चांकावर आल्याने ग्राहकांची पावलं सराफा बाजाराकडे वळली. चांदी गेल्या आठवड्यात 1000 रुपयांनी स्वस्त झाली. आता किंमतीत किंचित वाढ झाली आहे. काय आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 16 February 2024
सोने झाले स्वस्त
या आठवड्यात सोने जवळपास 900 रुपयांनी स्वस्त झाले. त्यात बुधवारी 680 रुपयांच्या घसरणीची भर पडली. 13 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 110 रुपयांनी उतरला. तर 14 फेब्रुवारी रोजी 680 रुपयांची स्वस्ताई आली. 15 फेब्रुवारी रोजी सोने 100 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,040 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने दिला दिलासा
या महिन्यात चांदी 1700 रुपयांनी महागली. तर 2 हजार रुपयांनी स्वस्त झाली. 5 फेब्रुवारीला 300 तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी उतरल्या. 7 आणि 8 फेब्रुवारीला किंमती जैसे थे होत्या. 9 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी चांदी महागली. 12 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. तर 14 फेब्रुवारी रोजी 1500 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 15 फेब्रुवारी रोजी किंमती 500 रुपयांनी वाढल्या.गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),सोने घसरले आणि चांदी वधारली. बुधवारी 24 कॅरेट सोने 61,508 रुपये, 23 कॅरेट 61,262 रुपये, 22 कॅरेट सोने 56,341 रुपये झाले. 18 कॅरेट 46,131 रुपये, 14 कॅरेट सोने 35,982 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,203 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.