अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०८ ऑगस्ट २०२३ :-सध्या सर्व कंपनीच्या रिचार्ज प्लॅनची किंमत खूप वाढली आहे. जर तुम्ही स्वस्तात रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक रिचार्ज प्लॅन आणला आहे ज्याची किंमत खूप कमी आहे.रिलायन्स जिओच्या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर JioTV, JioCinema आणि JioCloud सारख्या ऑप्समध्ये प्रवेश मिळेल. कंपनीच्या या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटाचा लाभ मिळेल. किमतीचा विचार केला तर या प्लॅनची किंमत 149 रुपये इतकी असून या प्लॅनची वैधता 20 दिवसांची आहे. हे लक्षात घ्या की रिलायन्स जिओच्या 149 रुपयांचा रिचार्ज प्लॅनची वैधता फक्त 20 दिवसांची असेल, या प्लॅनसह रिचार्ज करण्याचा तोटा हा आहे की हा प्लॅन कंपनीच्या 5G स्वागत ऑफरचा भाग नाही. समजा तुमच्या भागात Jio च्या 5G सेवा उपलब्ध असेल तर तुम्हाला 239 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या प्लॅनसह रिचार्जिंगवर अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे 149 रुपयांच्या प्लॅनमधील रिचार्जवर ही ऑफर ग्राहकांना मिळणार नाही.जाणून घ्या फायदे

ज्यावेळी रिलायन्स जिओचे सदस्य 149 रुपयांच्या प्लॅनमधून रिचार्ज करत असतात त्यावेळी त्यांना 20 दिवसांची वैधता मिळत आहे, याचाच असा अर्थ की रिचार्जचा दैनिक खर्च 7.45 रुपये इतका आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटाचा लाभ मिळत असून यात एकूण 20GB डेटा मिळतो. तसेच हा डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. तुम्हाला या प्लॅनसह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनसोबत मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्यासोबत रिचार्ज केला तर JioTV, JioCinema आणि JioCloud सारख्या अॅप्समध्ये प्रवेश मिळेल. तसेच जर वापरकर्त्यांना या प्लॅनचा रिचार्ज केल्यानंतरही 5G सेवेचा लाभ पाहिजे असेल तर त्यांना 61 रुपयांच्या डेटा व्हाउचरने रिचार्ज करता येईल. या व्हाउचरने रिचार्ज केल्यास तुम्हाला कंपनीच्या 5G सेवांचा लाभ मिळेल.(AKOLA NEWS NETWORK )


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!