Sunday, February 25, 2024
Homeक्रिडा विश्वहार्दिक पांड्याने SIX मारुन टीमला जिंकवलं तरी त्याला ठरवलं स्वार्थी…

हार्दिक पांड्याने SIX मारुन टीमला जिंकवलं तरी त्याला ठरवलं स्वार्थी…

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०९ ऑगस्ट २०२३:-T20 सीरीजमध्ये सलग दोन पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पांड्या प्रत्येकाच्या निशाण्यावर होता. टीम इंडिया मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. आयपीएल स्टार्सनी भरलेल्या टीमपासून विजय दूर दिसत होता. टीम इंडियाने वेस्ट इंडिजमधल्या T20 सीरीजमध्ये पहिला विजय मिळवून मालिकेतील आव्हान कायम ठेवलय. टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 7 विकेटने विजय मिळवला. कॅप्टन हार्दिक पांड्याने या विजयात किफायती गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजीने योगदान दिलं.हार्दिकने चांगलं नेतृत्व केलं. पण त्याच्या एका कृतीमुळे भारतीय फॅन्स निराश झाले. त्याला सेल्फिश स्वार्थी ठरवलं. गुयानाच्या प्रोविडेंस स्टेडियममध्ये मॅच झाली.

मुंबई इंडियन्सच्या दोघांची कमाल
वेस्ट इंडिजने पहिली बॅटिंग करताना 159 धावा केल्या. टीम इंडियाकूडन कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. हार्दिकने 3 ओव्हर्समध्ये फक्त 18 धावा देऊन धावगतीला लगाम घातली. सूर्यकुमार यादवच्या (83) आणि तिलव वर्मा (49 नाबाद) यांच्या फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने 17.5 ओव्हर्समध्ये 7 विकेटने विजय मिळवला. कॅप्टन पांड्याने स्वत: नाबाद 20 धावा केल्या.

फॅन्सना हार्दिकचा सिक्स का नाही आवडला?
हार्दिकच्या बॅटमधूनच विजयी धाव निघाली. त्याने रोव्हमॅन पॉवेलच्या गोलंदाजीवर सिक्स मारुन टीमला विजय मिळवून दिला. सिक्स मारुन विजय मिळवून देणं खास आहे, कारण टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी अशा पद्धतीने टीमला विजय मिळवून द्यायचा. हार्दिकच्या या सिक्समुळे फॅन्सना धोनीची आठवण आली. पण यामागे दुसरं कारण होतं. हार्दिकने अशा प्रकारे सिक्स मारुन मॅच संपवण फॅन्सना आवडलं नाही.

18 चेंडूत हव्या होत्या 6 धावा
टीम इंडियाने फक्त 34 रन्सवर दोन विकेट गमावले होते. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी 87 धावांची भागीदारी करुन टीम इंडियाचा विजय सुनिश्चित केला. सूर्या बाद झाल्यानंतर हार्दिक बॅटिंगसाठी आला. 17 ओव्हर अखेरीस टीम इंडियाची धावसंख्या 154 धावा होती. विजयासाठी 18 चेंडूत फक्त 6 धावांची गरज होती.

हार्दिकने असं काय केलं?
तिलक वर्मा आपल्या अर्धशतकाच्या जवळ होता. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर तिलकने 1 धाव घेतली. तो 49 रन्सवर पोहोचला. हार्दिक स्ट्राइकवर आला. अनेकांना असं वाटत होतं की, हार्दिक पुढच्या 2 चेंडूंवर धाव घेणार नाही. तिलकला तो हाफ सेंच्युरी पूर्ण करण्याची संधी देईल असं सर्वांना वाटत होतं. पण हार्दिकने सिक्स मारुन विजय मिळवून दिला. त्यामुळे तिलकच सीरीजमध्ये सलग दुसरं अर्धशतक पूर्ण होऊ शकलं नाही. हार्दिकने असं काय केलं?

तिलक वर्मा आपल्या अर्धशतकाच्या जवळ होता. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर तिलकने 1 धाव घेतली. तो 49 रन्सवर पोहोचला. हार्दिक स्ट्राइकवर आला. अनेकांना असं वाटत होतं की, हार्दिक पुढच्या 2 चेंडूंवर धाव घेणार नाही. तिलकला तो हाफ सेंच्युरी पूर्ण करण्याची संधी देईल असं सर्वांना वाटत होतं. पण हार्दिकने सिक्स मारुन विजय मिळवून दिला. त्यामुळे तिलकच सीरीजमध्ये सलग दुसरं अर्धशतक पूर्ण होऊ शकलं नाही. हार्दिकच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर ट्रेंड होता.

(AKOLA NEWS NETWORK )

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!