अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ जुलै २०२३:-अकोला जिल्ह्यातील पातूर परिसरात एका 18 ते 20 वर्षाच्या युवतीचा मृतदेह आधल्याने एकच खळबळ उडाली ह्या मृतक युवतीचे हातपाय बांधलेल्या परिस्थितीत असल्याने घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पातूर येथील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाजवळील शेत शिवारात जाणाऱ्या पांदन रस्त्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात एक बेवारस मृतदेह येथील गावाकऱ्यांना दिसला काटेरी झुडपात हातपाय बंधलेल्या परिस्थितीत हा मृतदेह असल्याने याची माहिती तत्काळ पातूर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता येथील हात पाय बंधलेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह एका 18 ते 20 वर्ष वयाचा मुलीचा असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनात आली पातूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी सदर बाब त्वरित आपल्या वरिष्ठाना सांगून तपास सुरु केला आहे. घटनास्थळी पातूर पोलीस ठसे तज्ञ फॉरेनसिक लॅब चे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. सदर युवतीचे हातपाय बंधून असल्याने या युवतीचा घतपात झाला असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून नेमकी ही युवती कोण? या युवतीचा घातपात झाला की अजून काही? याचा तपास पोलीस लावत असून तपासा अंतीच सर्व निष्कर्ष बाहेर निघेल.