अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो स्वप्नील सुरवाडे प्रतिनिधी पातूर दिनांक ३० जुलै २०२३ – पातूर : संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या विधानामुळे चर्चेत असलेल्या संभाजी भिडे यांचे पातूर शहरात आगमन होणार असल्याची माहिती मिळाली असता शहरातील बहुजन विचारसरणीच्या सर्वधर्मीय अनुयायांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.

दि. ३० जुलै रोजी पातूर शहरात मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडे चा कार्यक्रम प्रायोजित होता,त्यानिमित्ताने पातूर शहरात मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे पातूर शहरात आगमन होताच पोलीस स्टेशन चौक जुने बस स्थानक येथे जमलेल्या फुले-शाहू-आंबेडकर अनुयायांनी कडाडून नारे लावत विरोध दर्शवून निषेध केला.सदर निषेध आंदोलनामध्ये बहुजन विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंना अभिप्रेत नसलेला राष्ट्रीय ध्वज दाखवले, तसेच महात्मा फुले देशद्रोही असल्याचं तथा महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य मागील काही काळात संभाजी भिडे यांनी केलं होतं व सतत बहुजन महापुरुषांबद्दल अवमानकारक आक्षेपार्ह विधान करत असल्यामुळे यावेळी आंदोलनकारकांनी हातात महात्मा फुले व बाबासाहेबांची प्रतिमा दाखवून ‘संविधान जिंदाबाद’, ‘महात्मा फुलेंचा जयघोष’, ‘महात्मा गांधी अमर रहे’, ‘तिरंगा झेंड्याचा विजघोष’, तसेच मनोहर भिडे मुर्दाबाद असे नारे लावून जोरदार विरोध प्रदर्शन केले.

यावेळी संभाजी भिडे वाशिम कडून पातूरला आले असता जुने बस स्थानक परिसरात आंदोलनकर्त्यांच्या जोरदार रोषाचा सामना करत महात्मा फुले यांच्या नावाचा एकच जयघोष ऐकावयास मिळाल्याने त्यांनी समोर जाऊन संभाजी चौक येथील महात्मा फुले स्मारक येथे जाऊन महात्मा फुलेंच्या पुतळ्याला हार अर्पण करून वंदन केल्यामुळे आज पातूर शहरात मनोहर भिडेंना फुलेंच्या समोर झुकावेच लागले असून “बाप तो बाप रहेगा” अशा नारेबाजी करण्यात आल्या,त्यानंतर नियोजीत कार्यक्रम आटोपून संभाजी भिडे आपल्या पुढील दौऱ्यावर रवाना होताच वरूनराजाने जोरदार हजेरी लावली असता “भिडे गेल्याबरोबर निसर्गाने पाऊस पाडून महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे शुद्धीकरण केले” अशा प्रतिक्रिया देत विरोध करणाऱ्यांकडुन हर्षोल्हास करण्यात आला.

सदर आंदोलनास भिमजयंती सार्वजनिक उत्सव समिती व महात्मा फुले स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून या आंदोलनास ब्ल्यु टायगर्स,संभाजी ब्रिगेड,माळी महासंघ,काँग्रेस पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,तथा पातूर शहरातील बहुजन विचारधारेच्या सामाजिक संघटना यांनी पाठींबा देऊन सहभाग घेतला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष निर्भय पोहरे,महात्मा फुले स्मारक समितीचे सुरेंद्र उगले, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप काळपांडे,बिरसा उलगुलान चे जिल्हाध्यक्ष विलास धोंगडे, भिमज्योत व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रवीण पोहरे, ब्ल्यु टायगर्स चे संस्थापक स्वप्निल सुरवाडे, मुकेश खंडारे, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सै. बुऱ्हाण, सै.मुजाहिद, हाजी कमरुद्दीन, सामाजिक कार्यकर्ते राणा डाबेराव, माळी महासंघाचे विजय बोचरे, मुखतार मास्टर, संदीप बंड, मंगेश गवई, सूरज धाडसे, जितू सिरसाट, मंगेश डोंगरे, स्वप्निल गवई, निखिल सहस्त्रबुद्धे, विजय बोरकर, सतीश सुरवाडे,गजानन बारताशे, परशराम बंड आदी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

संभाजी भिडे यांच्या संपूर्ण महाराष्ट्राभरात सुरू असलेल्या दौऱ्यादरम्यान प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात वंचित बहुजन आघाडीकडून विरोध प्रदर्शन करण्यात आले असून वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई देखील केली.

त्याचप्रमाणे आज पातूर शहरात आज संभाजी भिडेंच्या आगमनानिमित्त विविध सामाजिक संघटनांनी विरोध प्रदर्शन केले मात्र वंचित बहुजन आघाडीच्या पातूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सपशेल पाठ फिरवल्याने वंचितचे कार्यकर्त्यांची तालुका पदाधिकऱ्यांवर नाराजी दिसून आली.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!