Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वाढदिवस निमित्याने वृक्षारोपण कार्यक्रम प्रेरणा पंधरवडा अभियान...

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वाढदिवस निमित्याने वृक्षारोपण कार्यक्रम प्रेरणा पंधरवडा अभियान अंतर्गत शिव वृक्षारोपण लागवड

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २८ जुलै २०२३:- पर्यावरणाचे मानवी कृतीमुळे होणारे नुकसान व त्यामुळे वाढणारे प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे गरजेचे असते. दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत आहे. येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वटवृक्षांची लागवड करुन वृक्षारोपण कार्यक्रमास हातभार लावा, निसर्ग रक्षणास सहकार्य करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना माध्यमिक विभाग उपजिल्हा प्रमुख शरद बुंदे सर यांनी केले.

वाढती लोकसंख्येमुळे वृक्षतोड वाढत आहे, अशा परिस्थितीत वृक्षांची संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने प्रेरणा पंधरवडा अभियान अंतर्गत शिव वृक्षारोपण लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. निसर्ग मानवाला खूप काही देत असतो. याची जाण ठेवून प्रत्येक तरुणांमध्ये समाजकल्याणाची आणि निसर्गाशी जोडण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. एकेक झाड लावूया वसुंधरेला सजवूया, असा नारा देत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाचा प्रारंभ सार्वजनिक महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आला यावेळी उपस्थित सार्वजनिक विद्यालय व क. महा. चोहोट्टा बाजार चे प्राचार्य साळकर सर , घुगे सर, शरद बुंदे सर (उपजिल्हाप्रमुख शिक्षक सेना) बुटे सर, खोटरे सर, घोगरे सर, सोळंके सर, वरखेडे सर, ढोकणे सर, खेडकर सर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp