Wednesday, May 22, 2024
Homeताज्या घडामोडीअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी दोघेही ठार ; अकोला-पातूर रोडवरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी दोघेही ठार ; अकोला-पातूर रोडवरील घटना

अकोला न्यूज नेटवर्क स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी पातुर दिनांक १८ सप्टेंबर २०२३ :-पातूर ते अकोला रोडस्थित असलेल्या सबस्टेशन जवळील उडानपुला समोर अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.पातूर पासून अकोल्याकडे जाताना सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या सबस्टेशन जवळील उडानपुला समोर आज दि.17/09/2023 रोजी सुमारे 5:40 वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीस समोरासमोर धडक देऊन पळ काढला.सदर धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला होता.

सदर अपघाताच्या माहितीवरून पातूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता तिथे दुचाकीस एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याचे निदर्शनास आले असून आपल्या शेतातून दुचाकीने परत येत असलेले पती-पत्नी गंभीर अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले.

सदर घटनेची सविस्तर हकीकत अशी की,पातूर ते अकोला रोडवर असलेल्या उडान पुलासमोर एक अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वारास धडक दिली असता हा दुचाकीस्वार व मागे बसलेली त्याची पत्नी गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याने 108 रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमी दुचाकीस्वार पुंडलिक निमकंडे (वय 70) व त्यांची पत्नी रत्ना निमकंडे (वय 65) रा.पाटील मंडळी, पातूर यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले असता उपचारानंतर पुंडलिक निमकंडे यांचा मृत्यू झाल्याच्या काही तासांच्या अवधीतच त्यांची पत्नी रत्ना निमकंडे यांचा देखील मृत्यू झाल्याने पातूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर अपघातास कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहनाचा शोध व पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!