अकोला न्यूज नेटवर्क सुधाकर राऊत प्रतिनिधी चतारी दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४:- शासन वृक्षलागवडी साठी करोडो रूपये खर्च करून पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील अवैध वृक्षतोड करणारे ठेकेदार शासनाच्या धोरणाची पायमल्ली करून झपाट्याने अवैध वृक्षतोड करीत आहे यामुळे जंगल भकास होत असल्याने शासनाच्या वृक्षलागवड या धोरणावर पाणी फिरवण्याचे काम करीत आहेत यावर आळा घालण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी अवैध वृक्षतोड करणाऱ्या वर कारवाई चा बडगा कायम ठेवण्याची गरज आहे.
आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या चतारी येथे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने या परिसरातील वृक्ष कत्तल केल्यामुळे हा परिसर भकास होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे सदरच्या अवैध वृक्ष तोड करणाऱ्यांनी आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डांबररोड लगतच्या झाडावर सुद्धा बडगा चालवला असुन खुलेआम अवैध वृक्षाची कत्तल केली जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या अवैध वृक्षतोड विषयीची माहिती आलेगाव वनपरिक्षेत्र कर्मचारी यांना दिली परंतु या डांबररोड वर सुरू असलेल्या वृक्ष तोडीला आळा घालण्यासाठी दिरंगाई करण्यात येत आहे या अवैध वृक्ष तोडी विषयी माहिती आलेगाव वनपरिक्षेत्र कर्मचारी असून या अवैध वृक्षतोंड करणाऱ्यावर काय कारवाई केली जाते याकडे लक्ष केंद्रित केले आहे.