Monday, September 16, 2024
Homeताज्या घडामोडीआता मूल्यमापनाचे गुण बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावे लागणार / दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात...

आता मूल्यमापनाचे गुण बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावे लागणार / दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १८ जानेवारी २०२४:- दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. त्यातच आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. यामध्ये १०वी आधि १२वीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंड परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ओएमआर गुणपत्रिकेत पाठवले जात होते. मात्र याच संदर्भात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता हे गुण बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावे लागणार आहे.

राज्य मडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यातून राज्य मंडळांनी ऑनलाइन गुण भरण्याबाबतची कार्यपद्धती दिली आहे. राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. यामध्ये मेकर आणि चेकरचा समावेश केला असून शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य चेकरची भूमिका बजावणार आहेत.

बोर्डाच्या या संकेतस्थळावरुन गुण मंडळाकडे पाठवावे लागणार आहेत. त्यासाठी मुख्य लॉगिन आयडीवरुन शाळा, महाविद्यालयाचा अधिकृत ईमेल आणि नियुक्त केलेल्या प्रतिनिधीचा मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. शाळेमधून एक किंवा अधिक वापरकर्ते तयार करणे आवश्यक आहे. यानंतर, संबंधित वापरकर्त्याला विषयानुसार प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण किंवा श्रेणीची नोंद करणारआहेत. ऑनलाइन प्रवेश केल्यानंतर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य चेकरची भूमिका पार पाडणार आहेत.

प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देऊन शकलेल्या विद्यार्थांसाठी ‘आउट ऑफ टर्न’ परीक्षा लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळाने कळवलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येणार आहे. नियमित कालावधीत गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे मीटिंग नंबर संबंधित कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळांना ‘आउट ऑफ टर्न’ परीक्षेसाठी प्रदान केले जातील. या विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता ऑनलाइन पद्धतीने नोंदवावी लागेल. ऑनलाइन प्रणालीमुळे अंतर्गत गुणांचे शालेय स्तरावर दर्जेदार काम अद्ययावत होणार आहे. यामुळे मंडळामधील कामाचा ताण कमी होईल आणि त्यातून निकाल लवकर लावणे शक्य होणार आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक सर्व काही तपासणार असल्याने चुकांची शक्यता नसणार आहे. काळाप्रणाणे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बदल करत राहणार आहेत. या अतिरिक्त प्रणालीमुळे वेळत बचत देखील होईल. (ANN AKOLA NEWS NETWORK)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp