Sunday, September 15, 2024
Homeब्रेकिंगकेदारनाथमध्ये दरड कोसळली ४ जणांचा मृत्यू, १२ जण बेपत्ता

केदारनाथमध्ये दरड कोसळली ४ जणांचा मृत्यू, १२ जण बेपत्ता

रुद्रप्रयाग- उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रा मार्गावर डाट पुलाजवळ गौरीकुंड येथे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक दरड कोसळली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून १० ते १२ जण अजूनही गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
या दुर्घटनेत डोंगराच्या पायथ्याशी असलेली तीन दुकाने वाहून गेली असून तीन दुकाने दरडीखाली गाडली गेली आहेत.

या दुकानांतील १२ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या बेपत्ता लोकांमध्ये स्थानिकांसह नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, एसडीआरएफ, एनडीआरएफ यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या.
या घटनेमुळे केदारनाथ यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. बेपत्ता असलेल्या काही लोकांपैकी काहीजण पाण्यात वाहून गेल्याचादेखील अंदाज व्यक्त केला जात आहे. मंदाकिनी नदीला पूर आला असून मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp