Saturday, September 14, 2024
Homeताज्या घडामोडीनागपुरात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

नागपुरात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २३ सप्टेंबर २०२३ :-नागपुरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा (Yellow Alert) देण्यात आला आहे. नागपुरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपुरात रात्री १०६ मिमी पावसाची हवामान खात्याने नोंद केली आहे. रात्री अचानक आलेल्या पावसाने सर्वत्र पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या घरात पाणीत शिरले आहे. प्रशासनाने आज शाळांना सुट्टी जाहीर केली. नागपुरात मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक खोल भागात पाणी शिरले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. हवामान विभागाने नागपुरात आधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. खरं तर इथे अजूनही पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा (येलो इशारा देण्यात आला आहे.

तर उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात विक्रमी पावसाची नोंद हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता होती. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर नागपुरात पाऊस सुरूच होता. मात्र, रात्री या पावसाचा जोर वाढल्याने अंबाझरी तलाव ओसंडून वाहत होता. नागपुरात गेल्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण होते. अनेक वाहने आणि घरातील सामान पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने काम सुरू केले. याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. त्यानुसार एनडीआरएफची एक तुकडी आणि एसडीआरएफच्या दोन तुकड्या बचाव आणि मदतकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. नागपुरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून काही भागात पाणी शिरले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितले की अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. नागपूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले असून, तातडीने आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक टीम आणि एसडीआरएफची टीमे बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूरचे पोलीस आयुक्त आणि नागपूरचे जिल्हा दंडाधिकारी यांना लवकरात लवकर अडकलेल्या लोकांसाठी मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत,

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp